Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण आहे नुकताच झालेला कॅप्टन्सी टास्क. या कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम अरबाजच्या बाजूने खेळताना दिसला. संग्राम ‘बी टीम’मध्ये असूनही ‘ए टीम’मधल्या अरबाजबरोबर स्ट्रॅटजी करताना पाहायला मिळाला. एवढंच नाहीतर कॅप्टन्सी टास्कच्या निर्णायक फेरीत तो अरबाजला रोखू शकला नाही. यामुळे सध्या मराठी कलाकारांसह नेटकरी संग्राम चौगुलेवर टीका करताना दिसत आहेत.
“संग्रामला अक्कल नाही. फक्त शरीर आहे. त्याने मेंदू घरी ठेवलाय”, “संग्राम खूप वाईट आहे. त्याने संपूर्ण टीमचा विश्वासघात केला”, “हा फुसका बॉम्ब निघाला”, “संग्राम भित्रा वाटतोय”, “हा पुढच्या आठवड्यात घराबाहेर येणार. याला खेळ काही समजला नाही. हा शो बघून आला तरी पण काही उपयोग नाही”, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. नेटकऱ्यांनी संग्रामच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कलाकार देखील सोशल मीडियावर पोस्ट करून संग्रामच्या खेळाविषयी बोलत आहेत.
हेही वाचा – रेल्वे प्रवासातील ‘त्या’ प्रसंगाने अशोक सराफांना शिकवला धडा, म्हणाले, “आपली इमेज…”
कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्याच फेरीत संग्रामने अरबाजबरोबर डील केली. यामुळे संग्रामच्या ‘बी टीम’मधील पंढरीनाथ आणि अंकिता कॅप्टन्सीच्या शर्यतीतून पहिल्याच फेरीत बाद झाले. या डीलमुळे संपूर्ण डाव पलटला. ‘बी टीम’मधील सगळेच सदस्य कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर गेले. त्यामुळे आता अरबाज, धनंजय, वर्षा आणि सूरज यांच्यात आता अंतिम कॅप्टन्सी टास्क खेळला जाणार आहे. या टास्कनंतर घराला नवा कॅप्टन मिळणार आहे. पण कॅप्टन्सी टास्कमधील संग्रामच्या एकंदरीत खेळावरून मराठी अभिनेत्याने त्याच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा – Video: अभिजीत सावंतला साडी नेसवून केला भन्नाट मेकअप, अरबाज म्हणाला, “छम्मक छल्लो”
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील मल्हार म्हणजे अभिनेता कपिल होनरावने याने संग्राम विरोधात इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर केली आहे. कपिलने पोस्टमध्ये लिहिलं आहे, “वाइल्ड कार्ड एन्ट्री खरंच फुसकी ठरली राव…#BiggBoss 5…अरबाज कमाल खेळतोय…”
रितेशने संग्रामची केलेली कानउघडणी
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने संग्रामला चांगलंच सुनावलं होतं. ‘मिस्टर इंडिया’, ‘माइल्ड कार्ड’ या शब्दांचा वापर करून रितेशने त्याची कानउघडणी केली होती. रितेश संग्रामला म्हणाला होता, “तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात ‘मिस्टर इंडिया’ आहात. तुम्ही दिसतच नाही आहात. महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्यांनी एक अख्खा गेम पलटवून टाकावा. पण या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेला आहात.”