Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या जोरदार सुरू आहे. पहिल्या दिवसापासून घरात एकमेकांचे वाद होत आहेत. वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वाद तर थांबायचं नावचं घेतं नाहीये. निक्की सतत वर्षा उसगांवकरांचा अपमान करताना दिसत आहे. अनेक मराठी कलाकारांनी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे निक्की विरोधात आवाज उठवला आहे. अशातच अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी देखील वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वादावर स्पष्ट मत मांडलं आहे.

नुकतीच अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi ) शो स्वीकारण्यापासून त्यांचा घरात कसा अपमान केला, याविषयी सांगितलं. किशोरी शहाणे म्हणाल्या, “‘बिग बॉस’ हा खेळच असा आहे ना की, तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी तयार रहावं लागतं. कारण कोण, कुठली रणनीती घेऊ येतंय, त्याचा तुम्ही अंदाज काढू शकत नाही. तुम्ही कितीही सीझन पाहिले तरी आतमध्ये गेल्यानंतर वेगळंच काहीतरी घडतं असतं. माझ्याबाबतीत असं झालं की, मी ‘बिग बॉस’चे आधीचे सीझन पाहिले नव्हते. माझं काम-माझा अभ्यास, माझं काम-माझं कुटुंब एवढंच माझं विश्व मर्यादीत ठेवलं होतं. माझी करमणूक करण्यासाठी ‘बिग बॉस’ बघत बसलीये, असं कधीच घडलं नाही. त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये जाईपर्यंत मला गेम प्लॅन माहित नव्हता. मी माझ्या मनात एवढंच ठरवलं होतं की, त्यावेळेस मला ज्या काही गोष्टी सुचतील, माझ्या पूर्ण आयुष्याच्या अनुभवावरून तशी मी नैसर्गिक वागले.”

Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
jp nadda slams Kangana Ranaut marathi news
जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी
A nine year old girl was sexually assaulted by her father in malad mumbai news
sexually assaulted case: नऊ वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश

हेही वाचा – ‘बालिशपणा’, ‘पागल’ म्हणणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीने दिलं चांगलंच उत्तर, म्हणाली…

… त्यामुळे मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले – किशोरी शहाणे

पुढे किशोरी शहाणे म्हणाल्या, “जेव्हा मला ‘बिग बॉस’ची ऑफर आली, तेव्हा मी म्हटलं, मी? कारण मला असा समज झाला होता की, शोमध्ये फक्त भांडणच असतं. लगेच ते म्हणाले, नाही आम्हाला समंजस्य व्यक्ती पाहिजे. त्यांनी मला एकप्रकारे गाजरचं दाखवलं. नवरा आणि मुलगा म्हणाले, तू जात नाही आहेस. तीन महिने तू सोडून जाणार आम्हाला? नाही…त्यानंतर आईला सांगितलं. आई फार उत्सुक होती. आई म्हणाली, जा…जा. तिने माझी खूप छान समजूत काढली. मग मी नवरा आणि मुलाची समजूत काढली. ते म्हणाले, तुला जायचं असेल तर जा. पण तो शो तुझ्यासाठी नाहीये. मी म्हटलं, मला माहिती नाही काय घडणार आहे ते. पण मी आव्हानं स्वीकारेन. मी जशी आहे तशीच मी वावरेन. मला काही कोणाची अनुकरण करायची गरज नाहीये. पण तिथे गेल्यावर माझा जो अपमान झाला. तसा अपमान माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. लहान असताना पण नव्हता झाला आणि मोठी झाल्यानंतर देखील माझा अपमान झाला नाही. पण तिथे जो अपमान होत होता ती समोरच्याची रणनीती आहे, हे मला कळतं नव्हतं. त्यामुळे लगेच सगळं विसरायचं असतं. पण तिथून मी नम्रपणे वरती आले. माझा जसा स्वभाव आहे, तसा तिथे होता. त्यामुळे मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आणि फायनलिस्ट म्हणून बाहेर आले. पण तुमच्यात खेळायची जिद्द असेल ना तर तुम्ही ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) जिंकू शकता. खेळताना आतून मजबूत राहणं खूप गरजेचं असतं.”

हेही वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! तीन वर्षांनंतर Squid Game 2 वेब सीरिज प्रेक्षकांच्या येणार भेटीस, प्रदर्शनाची तारीख…

Bigg Boss Marathi (Photo Credit - Colors Marathi)

त्यानंतर सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात ( Bigg Boss Marathi ) चर्चेत असलेल्या वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीच्या वादाविषयी विचारलं. तेव्हा किशोरी शहाणे म्हणाल्या, “अपमान करायला नाही पाहिजे. निक्कीसाठी ते चुकीचं असेल. पण वर्षाने भक्कमपणे उभं राहायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तिने हललं नाही पाहिजे. कारण या गोष्टी होणार. प्रत्येकाला जिंकण्यासाठी दुसऱ्याला बाहेर काढायचं आहे ना. नाहीतर जिंकणार कसं? एकमेकांचा उदो उदो करत बसलात तर जिंकणार कसं? हा वैयक्तिक खेळ आहे. मानसिक खेळ आहे.”