Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रविवारी पहिलं एविक्शन पार पडलं. गेल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. अखेर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर पुरुषोत्तम यांना घराचा निरोप घ्यावा लागला. “राम कृष्ण हरी” म्हणत त्यांनी या पर्वाचा निरोप घेतला.

‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी माऊलींची प्रार्थना करत छत्रपती शिवाज महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. यावेळी सगळे सदस्य हात जोडून उभे होते. यावेळी पुरुषोत्तम यांनी बाहेर जाऊन “मी सगळ्यांसाठी माऊलींकडे प्रार्थना करेन” असं सांगितलं. यावेळी छोटा पुढारी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. घराचा निरोप पुरुषोत्तम यांनी जयजयकार करून घेतल्याने सध्या सर्वत्र त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. परंतु, या सगळ्यात प्रेक्षकांना अरबाजबद्दल एक मोठी गोष्ट खटकली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Vishakha Subhedar Shares Special Post For pandharinath kamble
Bigg Boss Marathi: “आज स्वतःसाठी उभा राहा…”, विशाखा सुभेदारची ‘बिग बॉस मराठी’मधील ‘या’ सदस्यासाठी पोस्ट, म्हणाली, “दाखवून दे…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Premachi Goshta Fame actress Amruta Bane shares special post for husband on his birthday
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मिहिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, म्हणाली, “तू अल्लड आणि निर्मळ…”
Navari Mile Hitlerla leela take ukhana for aj abhiram
Navari Mile Hitlerla: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतला भन्नाट उखाणा, म्हणाली, “आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते…”
aishwarya narkar rupali character exit from saatvya mulichi saatvi mulgi serial
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून ऐश्वर्या नारकर यांची एक्झिट; म्हणाल्या, “यानंतर रुपाली…”
new marathi serial star pravah ude ga ambe produced by mahesh kothare
‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवी पौराणिक मालिका! पार पडला मुहूर्त सोहळा; महेश कोठारे म्हणाले, “याद्वारे महाराष्ट्रातील…”
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
navra maza navsacha 2 first poster
नवरा माझा नवसाचा २ : सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित! सचिन पिळगांवकर म्हणाले, “गणपतीपुळ्याचे प्रवासी कन्फर्म…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi: पहिल्याच आठवड्यात ‘हा’ स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर, छोटा पुढारी झाला भावुक

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य अरबाज पटेल हा, पुरुषोत्तमदादा पाटील महाराजांचा जयजयकार करत असताना काहीही न बोलता हाताची घडी घालून उभा असल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉस’ संदर्भात शेअर केलेल्या सगळ्याच पोस्टवर अरबाजच्या या कृतीबद्दल प्रेक्षकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. तर, काही युजर्सनी अरबाजला या घराच्या बाहेर काढा अशी मागणी देखील केली आहे.

अरबाजवर नेटकऱ्यांची नाराजी

पुरुषोत्तमदादा पाटील एविक्ट झाल्याची पोस्ट ‘कलर्स मराठी वाहिनी’ने शेअर केली आहे. यावर एक नेटकरी म्हणतो, “कलर्स मराठीला एक आवर्जून सांगायचंय…जेव्हा दादा बाहेर जाताना जय हरी विठ्ठल म्हणाले, तेव्हा सगळे त्यांच्याबरोबर जयजयकार करत होते… अगदी इरिना सुद्धा बोलत होती. पण, अरबाज मात्र हाताची घडी घालून गप्प उभा होता. अशा वृत्तीच्या लोकांना काय बोलावं? हात जोडले असते ना… सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकले असते पण, आता त्याला मत देण्यासाठी मला नाही वाटत कुणाचे हात धजावतील”, दुसरा युजर कमेंट करत म्हणतो, “माऊली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाले, तेव्हा हा अरबाज गप्प उभा होता, तरी हा Big Boss मराठी मध्ये कसा?” आणखी काही युजर्सनी “अरबाजच्या तोंडून एकपण शब्द बाहेर नाही पडला जेव्हा माऊली संतांचा जयजयकार करत होते तेव्हा” अशा कमेंट्स या पोस्टवर करत घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

bb marathi
कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या पोस्टवरील कमेंट्स ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हिची लायकी नाही”, निक्की तांबोळीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून पुन्हा भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मुर्ख आहे…”

Bigg Boss Marathi
बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi )
बिग बॉस मराठी : व्हिडीओ सौजन्य ( जिओ सिनेमा )

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील बेघर झाल्याने काही नेटकऱ्यांनी त्यांना खेळण्याची आणखी संधी मिळाली हवी होती असं देखील म्हटलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं तर दररोज रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण ‘कलर्स मराठी’ वाहिनी व जिओ सिनेमावर करण्यात येतं.