Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या दुसरा आठवड्याला देखील जबरदस्त सुरुवात झाली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीबी करन्सीवरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर कॅप्टन्सीचा टास्क रंगला आणि काल नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, निखिल दामले, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी आणि घनःश्याम दरवडे या स्पर्धकांना बहुमताने नॉमिनेट करण्यात आलं. आता बिग बॉसच्या कल्ला टीव्हीवर स्पर्धकांचे जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. याचे व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

बिग बॉसच्या ( Bigg Boss Marathi ) कल्ला टीव्हीवर निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. दोघं दादा कोंडके यांचं लोकप्रिय गाणं “हिल हिल पोरी हिला”वर भन्नाट परफॉर्म करणार आहे. यासाठी निक्कीने खास कोळी लूक केला आहे. हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचं ब्लाउज अशा कोळी लूकमध्ये निक्की डान्स करताना दिसणार आहे. निक्की व अरबाजच्या डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत, निक्की व अरबाजच्या डान्समधून दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांचा हा परफॉर्मन्स घरातील इतर स्पर्धक एन्जॉय करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: “त्याने अपमान नाही केला”, ‘त्या’ कृतीमुळे ट्रोल होणाऱ्या अरबाज पटेलसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “मुस्लीमसंबंधित नारेबाजी…”

निक्की तांबोळी व अरबाज पटेल व्यतिरिक्त योगिता चव्हाण, निखिल दामले, अंकिता प्रभू वालावलकर, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, इरिना यांचा देखील जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहे. तसंच अभिजीत सावंत एक लोकप्रिय गाणं गाताना दिसणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

हेही वाचा – Video: प्रसाद ओक बायकोला म्हणाला ‘बेकार’! चाहते म्हणाले, “ताईंचा घोर अपमान आहे हा…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) दुसऱ्या आठवड्यात योगिता, पंढरीनाथ, निक्की, घन:श्याम, सूरज आणि निखिल असे सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता पुरुषोत्तमदादा पाटीलनंतर कुठला स्पर्धक घराबाहेर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.