Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व दिवसेंदिवस आणखी रंजक होत आहे. विविध टास्कच्या माध्यमातून स्पर्धकांमधील खिळाडू वृत्ती पाहायला मिळत आहे. पण यादरम्यान कोणत्या ना कोणत्या कारणावरून स्पर्धकांमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. अशातच आता निक्की तांबोळी व अरबाज पटेलच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमधून दोघांत कडाक्याचं भांडण झाल्याच समोर आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या सुरुवातीपासून निक्की तांबोळी व अरबाज पटेलमधील मैत्रीण पाहायला मिळत आहे. अरबाज अनेकदा घरात निक्कीबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसला. त्यामुळे निक्की व अरबाजमधील मैत्री आणखी चांगली निर्माण झाली. अलीकडेच निक्की व अरबाजमध्ये वाजलं होतं. कारण होता अभिजीत सावंत. निक्की व अभिजीतची मैत्री अरबाजला खटकली होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. 'कलर्स मराठी'च्या सोशल मीडियावर नुकताच निक्की-अरबाजच्या भांडणाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निक्की हात जोडून अरबाजला तिच्यापासून दूर राहण्यासाठी सांगताना दिसत आहे. हेही वाचा - Video: “वंदे मातरम…”, अमृता खानविलकरने सुंदर सादरीकरणातून स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ प्रोमोमध्ये निक्की हात जोडून अरबाजला म्हणते की, अरबाज पूर्ण घराकडे जा माझ्याकडे येऊ नको. त्यानंतर अरबाज निक्कीला समजवताना पाहायला मिळत आहे. "जसं मी तुझ्याबरोबर वागतो ना, तसंच मी तिच्याबरोबरही वागणार." पण तरीही निक्कीचा राग शांत होत नाही. वैभवशी बोलताना निक्की म्हणते, "यार तो त्या मुलीकडे कसा जाऊ शकतो? ज्या मुलीच्या विरोधात मी गेले होते." दुसरीकडे अरबाज जान्हवीला बोलतो, "असं असलं तर मी पण तुमच्यासारखा गोड गोड बोलेन." पण इकडे निक्की रडत रडत वैभवला म्हणते की, त्याला द्या ट्रॉफी नाहीतर तो पागल होईल. यावेळी घनःश्याम व वैभव निक्कीला सावरताना दिसत आहे. हेही वाचा - Video: रेश्मा शिंदे आणि पूजा बिरारीचा आगरी गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक दरम्यान, निक्की व अरबाजमध्ये वाद नेमकं कोणामुळे झाला? हे आजच्या भागात समजेल. पण हे भांडण आर्यामुळे झाल्याची शक्यता आहे.