Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'मध्ये काल 'बीबी फार्म'चा उर्वरित टास्क दाखवण्यात आला. पण हा टास्क पूर्ण झाला नाही. कारण हा टास्क खेळताना सतत घरातील सदस्यांकडून नियम भंग आणि शक्तीच प्रदर्शन होत होतं. त्यामुळे 'बिग बॉस'ने 'बीबी फार्म' टास्क रद्द केला. यावेळी अंकिता वालावलकरला दुखापत झाली. पण यादरम्यान निक्की तांबोळी ज्याप्रकारे खेळली, त्यावरून कलाकार मंडळी संतापले आहेत. सोशल मीडियावर पुन्हा एकदा निक्कीविरोधात पोस्ट लिहित आहेत. बीबी करन्सी मिळवण्याकरिता दिलेला 'बीबी फार्म' टास्कमध्ये शक्ती प्रदर्शनामुळे पहिली फेरी रद्द करण्यात आली. यावेळी 'बिग बॉस'ने एक शिक्षा दिली. दोन्ही गटातील सदस्यांना विरोधी गटातील एका सदस्याला बाहेर काढायला सांगितलं. अभिजीतच्या टीमने वैभवला तर वर्षा उसगांवकरांच्या टीमने अरबाजला टास्कमधून बाहेर केलं. त्यानंतर पुन्हा टास्क खेळण्यात आला. पण यावेळी निक्की नियमांचं उल्लंघन करून खेळताना दिसली. यावर 'बिग बॉस'ने तिला थेट न बोलताना टास्क रद्द केला. त्यानंतरही निक्की कुठलीही ट्युटी करायला तयार नव्हती. एकंदरीत निक्की या आठवड्यात ज्याप्रकारे खेळत आहे. तेच काही कलाकारांना खटकलं आहे. त्यामुळे कलाकार मंडळी निक्कीविरोधात बोलत आहेत. यावरून अभिनेत्री प्रणित हाटे भडकली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Video: “वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली… सब सेटिंग है - प्रणित हाटे अभिनेत्री प्रणित हाटेने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर लिहिलं की, बिग बॉस हे काय चाललं आहे? निक्कीला एवढा पाठिंबा कसा काय मिळतो? निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे की बिग बॉसने निक्कीला? आणि जो माज तिला आलाय आहे आणि ह्यावर जर रितेश देशमुख काही बोलले नाही तर नक्की आहे सब सेटिंग है. हेही वाचा – Video: “माज जरा कमी कर”, निक्की तांबोळीवर संतापून सोनाली पाटीलने दिला सल्ला, म्हणाली… Pranit Hatte Instagram Story हेही वाचा - Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील पुर्णिमा तळवलकरांचा भाचीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल दरम्यान, या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.