Bigg Boss Marathi Season 5 : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तदादा पाटील हे घराबाहेर झाले. “राम कृष्ण हरी” म्हणत त्यांनी या पर्वाचा निरोप घेतला. पण यादरम्यान अशी एक घटना घडली ज्यामुळे अरबाज पटेल ट्रोल झाला. यावरून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने आपलं परखड मत मांडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

पुरुषोत्तदादा पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घराबाहेर जाताना माऊलींची प्रार्थना केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला होता. त्यामुळे यावेळी घरातील स्पर्धकांनी हात जोडून पुरुषोत्तमदादांसह जय घोषणा दिल्या. पण अरबाज पटेल काहीही न बोलता हाताची घडी घालून उभा होता. हेच प्रेक्षकांना खटकलं आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच अरबाजला ट्रोल केलं. “अरबाजला बिग बॉसच्या घराबाहेर काढा”, अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली. याच प्रकरणावर लोकप्रिय गंगा म्हणजेच अभिनेत्री प्रणित हाटेने परखड मत मांडलं आहे. तसंच यावेळी अरबाजला समर्थन करत नसल्याचं थेट सांगितलं आहे.

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
“…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला
Shubman Gill and Avneet Kaur dating
शुबमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण, कोण आहे जाणून घ्या?
actress spruha joshi made modak on the occasion of ganesh festival video viral on social media
गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती

हेही वाचा – Video: प्रसाद ओक बायकोला म्हणाला ‘बेकार’! चाहते म्हणाले, “ताईंचा घोर अपमान आहे हा…”

प्रणित हाटे काय म्हणाली?

व्हिडीओत प्रणित हाटे म्हणाली, “नमस्कार मी गंगा. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’मध्ये ( Bigg Boss Marathi ) एलिमिनेशन झालं. तेव्हापासून सर्वत्र एक चर्चा रंगलेली आहे. मी आधी बोलण्यापूर्वी स्पष्ट करते की, मी कोणत्याच जातीला समर्थन देत नाहीये किंवा माणसाला समर्थन देत नाहीये. इथे फक्त मत मांडते आहे. जेव्हा संतांना, थोर पुरुषांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जात होती. यावेळी अरबाज तिथे काही बोलला नाही. तर मला असं वाटतं, जर का त्या जागी त्याच्या धर्माचं काहीतरी असतं. कोणत्या तरी मोहब्बदाला मानवंदना दिली असती, त्यांच्या मुस्लीम धर्माचं जे काही असतं किंवा नारेबाजी दिली असती तर किती जणांनी पुढे येऊन जयघोष केला असता. प्रत्येकजण आपली संस्कृती, आपले विचार जपत असतं. त्याने काही असं वेगळं वागून अपमान नाही केलाय. मला नाही वाटतं, एवढं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. लोक म्हणतात, तो मराठी बिग बॉसमध्ये का आलाय? तर हा प्रश्न क्रिएटिव्ह आणि चॅनलला विचारायला पाहिजे. त्याची याच्यात काय चूक आहे. माहितीसाठी, मी काही अरबाजला समर्थन देत नाही.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

दरम्यान, याआधी अभिनेत्री प्रणित हाटे निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे भडकल्याचं पाहायला मिळालं. प्रणित म्हणाली होती, “‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात ज्येष्ठ कलाकारांना असं रडताना, अपमानित करताना बघून खूप वाईट वाटतं. कोणीतरी निक्कीला बोललं पाहिजे होतं. वर्षा उसगांवकर यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे होतं. पण एकामध्येही हिंमत नव्हती पुढे येऊन बोलायची की, तू चुकीची आहेस.”