Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चांगलाच रंगला. छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून खेळलेल्या या कॅप्टन्सी टास्कमध्ये काही सदस्य चांगले खेळले. त्यापैकी एक म्हणजे पंढरीनाथ कांबळे. पंढरीनाथ यांनी अरबाज, वैभव सारख्या तगड्या सदस्यांना चांगलंच पळवलं. याचं कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार अशा अनेक कलाकारांनी केलं. त्यानंतर आता ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं भरभरून कौतुक केलं आहे.

नुकताच ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘भाऊच्या धक्क्या’चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख पंढरीनाथ कांबळेचं कौतुक करताना दिसत आहे. रितेश म्हणाला, “पॅडी भाऊ, तुम्ही कॅप्टन्सीचा टास्क काय खेळलात. तुमचं क्विकनेस पाहण्यासारखा होता. तुम्ही ससा नाही झालात पण ससासारखे धावलात. लहानपणी तुम्ही कबड्डी, खो-खो असे बरेच खेळ खेळलेले दिसताय.”

pandharinath kamble heartfelt post for winner suraj chavan
पॅडी दादांच्या हातात ट्रॉफी दिली, मिठी मारली अन्…; सूरज-पंढरीनाथचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी भावुक, म्हणाले, “दोन खरी माणसं…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan became emotional at the memory of Pandharinath Kamble
Video: “पॅडी दादा…”, सूरज चव्हाण पंढरीनाथ कांबळेच्या आठवणीत झाला भावुक; म्हणाला, “मन भरून आलं…”
Purushottam Dada Patil Share Suraj Chavan Mother And father Photo
Video: सूरज चव्हाणच्या आई-वडिलांना पाहिलंत का? पुरुषोत्तमदादा पाटलांनी दाखवला फोटो, म्हणाले, “मला भरून आलंय…”
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel Talk About Suraj Chavan
“मी ही सूरजसारखा तळागाळातून आलोय…”, अरबाज पटेलचं वक्तव्य, म्हणाला, “त्याच्याकडे गेम नाहीये, पण…”
Vaibhav Chavan And Dhananjay Powar
Video : “तुझ्याबद्दल जे बोललो…”, धनंजय पोवारच्या वक्तव्यावर वैभव चव्हाण म्हणाला, “एक जवळचा मित्र…”
Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble Emotional after watching daughter video
Video: “तुझा एवढ्या दिवसांचा स्ट्राँग प्रवास पाहून…”, पंढरीनाथ कांबळेच्या मुलीने दिला धीर, म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble gave a answer to the question regarding Ankita Nikki
Video: “निक्कीबरोबर अरबाजच्या जागी पॅडी दादा असते तर…?” अंकिताच्या प्रश्नाला पंढरीनाथ कांबळेने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला…

हेही वाचा – Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने ‘हे’ गाणं लावून सर्व सदस्यांना केलं जागं, म्हणाला…

Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit - Colors Marathi )
Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit – Colors Marathi )

पंढरीनाथ कांबळे म्हणाला, “खेळ फार नाही. पण लहानपणापासून चपळाई होती आणि अजूनही आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणजे ती दिसतेय.” पुढे रितेश देशमुख म्हणाला, “आम्हाला दिसतेय, प्रेक्षकांना दिसतेय. अरबाजने किती जरी पकडायचा प्रयत्न केला. तरी तुम्ही अंगाला तेल लावून आला होता. खरं म्हणजे माझ्या मते हा आठवडा कोणी गाजवला असेल तर पॅडी भाऊ तो तुम्ही गाजवलात.”

हेही वाचा – “आपला पॅडी का रडला?” याचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा किस्सा, म्हणाली, “हा माणूस…”

हेही वाचा – Video: “मिस्टर इंडिया”, म्हणत रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची केली कानउघडणी, म्हणाला, “या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर…”

दरम्यान, या प्रोमोवर इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार, मेघा धाडे, साक्षी गांधी, वैभव घुगे या कलाकारांनी प्रोमोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच “पॅडी भाऊ हे खरे मास्टर माइंड आहेत”, “खपू छान खेळले भाऊ. भाऊंनी अरबाजला काय दमवलं”, “खरोखर पॅडी दादा खूप छान खेळला तुम्ही”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.