Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. अशातच या आठवड्यात टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ने दोन ग्रुप केले खरे पण, वैभवला यावेळी अभिजीतच्या गटातून खेळण्याची संधी मिळाली. तर, निक्कीच्या टीममध्ये योगिता, सूरज यांना पाठवण्यात आलं होतं. थोडक्यात काय तर, ‘बिग बॉस’ने ट्विस्ट म्हणून घरात सख्य असणाऱ्या मित्रमंडळींची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी केली होती.
बोटीच्या टास्कमध्ये सर्वाधिक मोती जमा करणारी टीम कॅप्टनसीसाठी पात्र ठरणार होती. परंतु, वैभवने कसलाही विचार न करता आणि अभिजीतच्या टीमशी गद्दारी करून अरबाज व निक्कीच्या बाजूने खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे अभिजीत संघ जिंकू शकला नाही. हा टास्क संपल्यावर इरिनाबरोबर चर्चा करताना वैभवने आपण मुद्दाम बॅगमध्ये कमी मोती भरल्याचं देखील मान्य केलं होतं. या चुकीच्या वर्तनामुळे आता रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर वैभवची चांगलीच शाळा घेतली आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “फ्लॉवर नही फायर है…”, बेधडक खेळणाऱ्या योगिताचं नवऱ्याने केलं कौतुक! सौरभ चौघुले घरात Wild Card एन्ट्री घेणार का?
Bigg Boss Marathi : रितेशने घेतली वैभवची शाळा
रितेशने वैभवला स्पष्ट शब्दात ताकीद देत ‘गद्दार’ म्हटलं आहे. “या घरात गद्दार कोण आहे?” असा प्रश्न रितेश घरातील सदस्यांना विचारतो, यावर अरबाज म्हणतो “वैभव…”
रितेश पुढे म्हणतो, “तुम्ही जर असं म्हणाला असता ना वैभव…मला तुम्ही तुमच्या टीममधला समजू नका तर एकवेळ चाललं असतं कारण, हे बोलायला जिगर लागतो आणि हा जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय त्यामुळे ‘गद्दार’ म्हणून बाहेर येऊ नका.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “निक्की व घनश्याम हे…”, छोटा पुढारीच्या मैत्रीबद्दल आईची प्रतिक्रिया; माफी मागत म्हणाल्या, “बिग बॉसमध्ये तो…”
वीकेंडच्या या जबरदस्त प्रोमोवर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. “वैभवला झापणं गरजेचं होतं”, “वैभव बैल आहे”, “भाऊचा जोरदार धक्का वैभवला” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून या प्रोमोवर आल्या आहेत.
वैभवप्रमाणे रितेश या आठवड्यात अरबाज, निक्की यांनाही अनेक गोष्टींबद्दल जाब विचारणार आहे. तर, सूरजच्या बेधडक खेळीचं रितेश कौतुक करणार आहे. याशिवाय ‘बिग बॉस’च्या आधीच्या पर्वातील स्पर्धक जय दुधाणे व उत्कर्ष शिंदे यावेळी भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा आहेत. आता हे दोघं येऊन काय कल्ला करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.