Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक निक्की तांबोळी नेहमी चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधानामुळे तर कधी चुकीच्या खेळामुळे चर्चेत असते. मंगळवारच्या ३ सप्टेंबरच्या भागात देखील निक्की पंढरीनाथ कांबळे व वर्षा उसगांवकरांचा अपमान करताना पाहायला मिळाली. अशातच निक्कीच्या वागणुकीवरून अभिनेत्री सोनाली पाटीलने तिला फटकारत मोलाचा सल्ला दिला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) तिसऱ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री सोनाली पाटीलने नुकताच व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली म्हणतेय, “कालच्या ( ३ सप्टेंबर ) भागात निक्की कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलीही ड्युटी करायला नकार देत होती. याचं कारण आर्याने पण सांगितलं आहे. निक्की नॉमिनेशनमध्ये आली आहे आणि खरंच ती नॉमिनेशनला घाबरते. का घाबरते हे माहित नाही. पण ती घाबरते. त्यामुळे तिने वर्षा ताईंना सांगितलं, मी ही ड्युटी करणार नाही. ती ड्युटी करणार नाही. ठीक आहे.”

bigg boss marathi season 5 pranit hatte angry on nikki tamboli
“निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे…”, मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख काही बोलले नाही तर…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
bigg boss marathi surekha kudachi slams nikki
“लाज काढलीये या बाईईईने”, सुरेखा कुडची निक्कीवर संतापल्या; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून…”
Bigg Boss Marathi 5
Video: “…तर तोंड करपणार”, पंढरीनाथने वर्षाताईंकडे केली तक्रार, सूरजने दिले जबरदस्त उत्तर; नेटकरी म्हणाले, “यांची केमिस्ट्री…”
Shilpa shinde karanveer Mehra wedding rumors
‘भाभीजी घर पर है’ फेम मराठामोळी शिल्पा शिंदे ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी होणार? चर्चांना उधाण
Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli and Arbaaz Patel talk about vishal
Video: “वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली…

हेही वाचा – ‘झिम्मा २’नंतर हेमंत ढोमेचा लवकरच येणार नवा चित्रपट, अभिनेत्याने स्वतःच्या गावात अन् शेतात केलंय चित्रीकरण

“पण एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेला ती असं म्हणत होती की, मी वॉशरूमची ड्युटी अजिबात करणार नाही. ती एवढे दिवस करत होतीच. तरीही ती म्हणाली, मी हे करणार नाही, ते करणार नाही. शिवाय ती बोट दाखवून म्हणत होती ना, मी टिश्यू असा किंवा तसा करणार नाही. निक्की तुला एक गोष्ट सांगते, जे प्रेक्षक डोक्यावर घेतात ना तेच प्रेक्षक डोक्यावरून खाली सुद्धा खेचतात. तू जे बोट करून बोललीस ना मी टिश्शू असा तसा करणार नाही. तू नॉमिनेशनमध्ये आली आहे आणि नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर जेव्हा त्याच बोटांनी तुला प्रेक्षक एलिमिनेट करतील तेव्हा तू घराबाहेर असशील. त्यामुळे हा माज जरा कमी कर. प्रेक्षक हे प्रेक्षक आहेत,” असं सोनाली पाटील म्हणाली.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ने निक्कीसाठी चहा बनवण्याचे आदेश देताच जान्हवी म्हणाली, “थोडी अक्कल किसून….”, नेमकं काय घडलं?

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील पुर्णिमा तळवलकरांचा भाचीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

या आठवड्यासाठी कोण नॉमिनेट झालं?

दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.