Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता आठवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात आर्या जाधव आणि वैभव चव्हाण घराबाहेर झाले. त्यामुळे घरात नऊ सदस्य बाकी राहिले आहेत. सध्या बीबी करन्सीसाठी टास्क सुरू आहे. ‘बिग बॉस’ने केलेल्या जोड्यांनुसार हा टास्क खेळला जात आहे. या जोडीमधील एका सदस्याला दिलेल्या पक्षी, प्राण्यांच्या अभिनय करायचा असून दुसऱ्या सदस्याला ते ओळखायचं आहे. आतापर्यंत तीन जोड्या खेळल्या आहेत.

पंढरीनाथ कांबळे आणि संग्राम चौगुले यांनी २० हजार तर धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर यांनी ३० हजार बीबी करन्सी जिंकली आहे. त्यानंतर जान्हवी किल्लेकर आणि अरबाज पटेल यांची ‘काककुवा’ पक्षामुळे चांगलीच तारांबळ उडाली. काकाकुवा पक्षी ओळखताना संपूर्ण पाण्याची टाकी शून्यवर गेली. त्यामुळे दोघं बीबी करन्सी जिंकू शकले नाहीत. आज उर्वरित जोड्या बीबी करन्सीचा टास्क खेळणार आहे. टास्कदरम्यानचा सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकरचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel got upset when Nikki and Abhijeet were announced as the popular couple
Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
Aarya Jadhao choose top 5 of Bigg Boss Marathi 5
तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर सूरज चव्हाण व अंकिता वालावलकरचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पाण गेंडा ओळखताना सूरजला नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी सर्व सदस्यांमध्ये एकच हशा पिकला असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – “तुझ्यासारखं व्यक्त होता येत नसलं तरी…”, प्रिया बापटच्या वाढदिवशी पती उमेशची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला…

Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit - Colors Marathi )
Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit – Colors Marathi )

प्रोमोमध्ये सुरुवातीला अंकिता पाण गेंड्याचा अभिनय करताना दिसत आहे. तेव्हा सूरज चव्हाण लगेच गेंडा असल्याचं ओळखतो आणि म्हणतो, “आणायला जाऊ का?” पण तो पूर्ण नाव घेत नसल्याचं संचालक अभिजीत सांगतो. मग अंकिता टाकीतून जात असलेल्या पाण्याला हात लावून सांगते. यावेळी पंढरीनाथ पाण गेंडा असल्याचं ओळखतो. पण सूरजला काहीच ओळखता येत नाही. तो म्हणतो, “अरे काहीच कळतं नाहीये.” यानंतर अंकिता अजून प्रयत्न करते. तेव्हा सूरज म्हणतो, “पोहतो? नाचतो? गेंडा ओळखला आहे. पण तो पाण्यातला गेंडा माहित नाही.” सूरज आणि अंकिताचा हा टास्क पाहून घरातील सदस्यांना हसू अनावर होतं.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ निघाली अमेरिकेला! विमानतळावर एकत्र जमले कलाकार; ११ शहरांमध्ये होणार शो, जाणून घ्या…

हेही वाचा – ‘बिग बॉस’ने बंद केलं घरचं गॅस कनेक्शन! घरात सुरू झाला अनोखा टास्क अन् अरबाज-जान्हवीची झाली ‘अशी’ फजिती

‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.