Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू असून सध्या कॅप्टन्सीचा टास्क पार पडत आहे. अरबाज पटेल, धनंजय पोवार, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे पाच सदस्य कॅप्टन्सीसाठी उमेदवार आहे. सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी ‘जादुई हिरा’ मिळवून कॅप्टन्सीसाठीच्या पाच उमेदवारीतील एका सदस्याला बाद करायचं आहे. गुरुवारी झालेल्या भागात ‘जादुई हिरा’ जान्हवी किल्लेकर आणि वैभवने उचलला. त्यामुळे जान्हवीने अरबाज तर वैभवने सूरजचं नाव कॅप्टन्सीमधून बाद केलं. आता धनंजय, वैभव आणि वर्षा उसगांवकरांमधील कोण सातव्या आठवड्यासाठी कॅप्टन होतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच सूरजला गावची आठवण येत आहे. यासंबंधित सूरजचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

‘टीआरपी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर सूरज चव्हाणचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज, पंढरीनाथ आणि अंकिता पाहायला मिळत आहे. सूरज पंढरीनाथ यांना मसाज देत गावाविषयी सांगताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांची अचानक झाली भेट, प्रसाद खांडेकर फोटो शेअर करत म्हणाला, “लवकरच…”

गावाच्या आठवणीत रमत सूरज काय म्हणाला? वाचा

सूरज म्हणतो, “मला गाव महत्त्वाचं आहे. मी कधी गाव बघतोय, असं मला झालंय. खरंच इथं नुसतं क्याव…क्याव…क्याव…” यावर अंकिता हसते आणि म्हणते, “हेच तर..यातूनच आपण भावनावरती आपला कंट्रोल करणार आहोत.” त्यानंतर सूरज म्हणतो, “अगं मी एकदम साधा मुलगा आहे आणि सनकी आहे. मी राग आल्यावर असा माणूस आहे की, पुढचं मागचं बघत नाही. त्यामुळे इथे शांत आहे. कंट्रोल केलं आहे. मनावर ताबा ठेवला आहे.” तेव्हा अंकिता म्हणते, “ताबा कसा…झापूक झुपूक”

पुढे पंढरीनाथ कांबळे म्हणतो की, तुझा ताबा मला एकट्यालाच माहित आहे. त्यावर अंकिता म्हणते, “त्या दिवशी बघितलं आहे.” त्यानंतर सूरज त्याच्या स्टाइलमध्ये म्हणाला, “मनावर ताबा हा कसा दिसतो बाबा.”

हेही वाचा – ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! कन्नड मालिकेचा रिमेक, प्रमुख भूमिकांसाठी ‘या’ दोन नावांची चर्चा

हेही वाचा – Video: सलमान खानने मलायका अरोराच्या कुटुंबाचे केले सांत्वन, अभिनेत्रीच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी केली आत्महत्या

दरम्यान, कॅप्टन्सी टास्कमध्ये खेळताना आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या थेट कानशिलात लगावली. यानंतर दोघींमध्ये जोरदार वाद झाले. त्यामुळे आता आर्याला ‘बिग बॉस’ कठोर शिक्षा सुनावणार आहेत. ही शिक्षा काय असणार आहे? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.