Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्वभावाने आणि खेळीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सूरजला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहेत. अशा या चर्चेत असलेल्या सूरजाला प्रेमात धोका मिळाला होता. 'कलर्स मराठी'ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सूरज त्याला प्रेमात कसा धोका मिळाला आणि त्यानंतर त्याने काय केलं? याविषयी सांगताना दिसत आहे. 'कलर्स मराठी'ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सूरज निक्की व घनःश्यामबरोबर गार्डन एरियामध्ये बसलेला दिसत आहे. यावेळी चर्चा करताना सूरजच्या प्रेमाचा विषयी निघाला. निक्कीने विचारलं की, तुला प्रेमात धोका मिळाला होता? सूरज म्हणाला, "हो." यावर लगेच रिअॅक्ट होऊन निक्की म्हणाली, "बाईईईई कधी? तू प्रेम केलं होतं?" सूरज म्हणाला, "हो." त्यावर निक्की म्हणाली, "तिला बुक्कीत टेंगुळ तर नाही दिला ना?" सूरज म्हणाला, "नाही." हेही वाचा - “देशप्रेम हे वांझोटं…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने मार्मिक पोस्ट लिहित स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाले, “लाल किल्यावरून भाषणं देऊन…. “ त्यानंतर सूरजने सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, "ती माझ्याबरोबर चांगली असायची. बोलायची, चालायची. पण तिला दुसरा चांगला गोरापान मुलगा आवडला. लगेच मला सोडून गेली. तिने मला गोलीगत धक्का दिला. मला लय राग आला. मी म्हटलं, आता मी स्वतः काहीतरी बनणार. मग काय, असला मोठा स्टार झालो ना. लोकांच्या मनावर राज्य केलं गोलिगतने. झापूक झुपुकने. आपली गाणी वाजतात." हे ऐकून निक्की म्हणाली, "नंतर कधी तिला बघितलं?" सूरज म्हणाला, "आता नाही." मग निक्कीने सूरजला त्या मुलीचं नाव विचारलं. त्यावर तो म्हणाला, "नाव नाही सांगणार. बिचारीचं चांगलं चाललंय. होऊ देत. मला उलट भारी वाटतं बाबा. ती तिच्या आयुष्यात खुश आहे." सूरजच्या याचं उत्तराने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ( Bigg Boss Marathi ) हेही वाचा – Video : ऐश्वर्या नारकरांचा ए. आर. रेहमान यांच्या तमिळ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ सूरज, निक्कीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. "पोरीनं धोका दिला पण महाराष्ट्र नाही देणार…नड तू", "शेवटपर्यंत नाव सांगितलं नाही इथंच जिंकलास भावा, हा बिचारा खूप निरागस आहे. सगळं खरं खरं बोलतो. तिला गोरापान मिळाला म्हणतो", "एवढा धोका देऊन पण तिच्याबद्दल अजून आदर…ती खुश आहे…भारी वाटतं…या गोष्टी सूरजकडून शिकण्यासारख्या आहेत", अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ( Bigg Boss Marathi )