Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सतत वाद होतं असतात. मंगळवारच्या भागामध्ये ‘सत्याचा पंचनामा’ टास्क खेळताना निक्की-अरबाज, निक्की-वैभव, घनश्याम तसंच अभिजीत-अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. वर्षा उसगांवकरांनंतर तिने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला. यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकलेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची भडकल्या. “तिच कर्तुत्व काय आहे? माज उतरावा”, असं लिहित त्यांनी जान्हवीवर टीका केली आहे. टास्क दरम्यान नेमकं काय घडलं? सुरेखा कुडची ( Surekha Kudchi ) नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…

‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये पंचनामा खोलीत वर्षा उसगांवकर यांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी बिग बॉसकडून ( Bigg Boss Marathi ) वर्षा यांच्याविषयी विधान करण्यात आलं की, घरातील सदस्यांच्या मते आपण निक्कीबरोबर वाद घालणं सोडून दिल्यापासून आपला खेळ संपला आहे. खरं की खोटं? बिग बॉसच्या या विधानावर वर्षा यांनी सहमती दर्शवली. विरोधी गटातील निक्कीने वर्षा यांच्या मतावर सहमती दर्शवली आणि ती हिरवा बजर दाबण्यासाठी तयारही झाली होती. पण तितक्यात टीममधल्या सदस्यांनी विरोध केला. तेव्हा बी टीममध्ये वाद झाले. पण अखेर बी टीमने वर्षा यांच्या मताशी असहमत असल्याचं जाहीर करून लाल बजर दाबला. त्यामुळे पंचनामा खोलीतून वर्षा रिकाम्या हातीचं परतल्या. त्यानंतर वैभव निक्कीमध्ये वाद झाले. याच वेळी जान्हवीने पुन्हा एकदा पातळी ओलांडली.

vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Rajkummar Rao and Patralekhaa Love Story
“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “एक आई म्हणून…”
Childs Hilarious Response to 'Where Were You at Your Parents' Wedding?'
“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याने दिले भन्नाट उत्तर, Video होतोय व्हायरल
Shibani Dandekar praised husband farhan akhtar first wife
मराठमोळ्या शिबानी दांडेकरने पतीच्या पहिल्या बायकोचं केलं कौतुक; सावत्र मुलींबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “त्या खूप…”
Ashwini Jagtap, Sharad Pawar, Chinchwad,
चिंचवड: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाणार? म्हणाल्या, “या सर्व गोष्टी…”

आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले

जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अ‍ॅक्टिंग घरात दाखवतायत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.” जान्हवीच्या याच वागण्यावरून सुरेखा कुडची भडकल्या. “माज उतरावा त्यांचा…खूप झालं आता…”, असं कॅप्शन सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा – “बदलापूरमध्ये सामान्य माणसांचा उद्रेक हा…”, हास्यजत्रेच्या दिग्दर्शकांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भयंकर, क्लेशदायक…”

अभिनेत्री सुरेखा कुडची पोस्टमध्ये लिहिलं आहे, “माज माज आणि माज…ती कोण आहे? जी बी टीमला भीक आणून देईन म्हणते…ती कोण आहे? जी त्या डीपीला गेट उघडू का विचारते?…ती कोण आहे? जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन…ती कोण आहे? जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून आता इथे ओव्हर अ‍ॅक्टिंग करायला आलाय म्हणतेय…आहे कोण ती?…काय कर्तुत्व आहे तिच?…कसला माज आहे हा?…हिला बिग बॉसचा आशीर्वाद आहे का?…रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करतेय…ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमत नाही होणार परत कुणाला असं बोलायची…शब्द ऐकूनच च*** ओली झाली असती…वारे वाह अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय, त्यांना काहीच बोललं जात नाहीये…या शनिवारी पाहायचं आहे या वर काही बोललं जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जातंय…”

हेही वाचा – “माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”

दरम्यान, सुरेखा कुडची यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खरंय ताई, हिचा माज उतरलाच पाहिजे. सर्व सिने कलाकारांची यांनी त्वरित माफी मागितली पाहिजे”, “अगदी सत्य आहे ताई, तुमच्या मताशी मी सहमत आहे”, “मांजरेकर सर पाहिजे होते”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.