Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू झाला आहे. शनिवारी, रविवारी रितेश देशमुखचा गणपती विशेष ‘भाऊचा धक्का’ पार पडला. शनिवारी रितेशने घरातील काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. तसंच घनःश्याम दरवडे बेघर झाला. त्यानंतर रविवार फुल्ल धमाल पाहायला मिळाली. गणेशोत्सवानिमित्ताने दमदार मनोरंजन झालं. यावेळी लोकप्रिय गायक-गायिकांचे परफॉर्मन्स झाले. तसंच विशेष पाहुणे म्हणून प्रसिद्ध संगीतकार सलीम मर्चेंट उपस्थितीत राहिले होते.

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणार गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता उत्कर्ष शिंदेने गणपती विशेष भागात हजेरी लावली होती. उत्कर्ष स्पर्धकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात गेला होता. यावेळी त्याने स्पर्धकांबरोबर सजावटीचा टास्क खेळला. त्यानंतर खास रितेश देशमुखने स्पर्धकांसाठी गिफ्ट्स दिले. हे गिफ्ट्स पाहून स्पर्धक भावुक झालेले पाहायला मिळाले. रितेशने या गिफ्ट्सच्या माध्यमातून काही फोटो पाठवले होते. ज्यामध्ये स्पर्धकांच्या घरातील गणपतीचा फोटो आणि कुटुंबियांचा फोटो होता. त्यामुळेच स्पर्धक फोटो पाहून रडायला लागले. यावेळी काही स्पर्धकांना गिफ्ट्स मिळाले नाहीत. त्यापैकी एक म्हणजे सूरज चव्हाण.

bigg boss marathi arbaz got emotional and reacts to engagement rumors
‘ते’ नातं संपवलं, १० दिवस जेवलो नाही अन्…; निक्कीची गळाभेट घेऊन अरबाज झाला भावुक, मनधरणी करत म्हणाला…
bigg boss marathi vaibhav and jahnavi talk about arbaz
“अरबाज घाणेरडा गेम खेळला…”, घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर…
bigg boss marathi riteish deshmukh grand finale comeback
Video : रितेश देशमुख ग्रँड फिनालेसाठी सज्ज! समोर आला डॅशिंग लूक; २ आठवड्यांच्या ब्रेकनंतर भाऊच्या धक्क्यावर परतला
bigg boss marathi grand finale first look abhijeet sawant and suraj chavan dance
Grand Finale ची पहिली झलक! सूरज अन् अभिजीतचा ‘झापुक झुपूक’ म्हणत जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ
vivian dsena in Bigg Boss 18
८ वर्षांत मोडला प्रेमविवाह, दुसऱ्या लग्नाआधी स्वीकारला इस्लाम धर्म; Bigg Boss 18 मध्ये दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
bigg boss marathi current voting trends suraj chavan
Bigg Boss Marathi चा विजेता कोण होणार? टॉप-६ पैकी आघाडीवर कोण? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
aishwarya narkar reacts to fans questions
‘बिग बॉस’ची ऑफर आली तर स्वीकारणार का? ऐश्वर्या नारकरांनी एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाल्या…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…
tharala tar mag arjun sayali love story break
ठरलं तर मग : अर्जुन-सायलीच्या लव्हस्टोरीला पुन्हा ब्रेक! तर, प्रतिमासाठी प्रियाने रचला मोठा डाव…; पाहा प्रोमो

हेही वाचा – Video: “निक्कीबरोबर अरबाजच्या जागी पॅडी दादा असते तर…?” अंकिताच्या प्रश्नाला पंढरीनाथ कांबळेने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला…

उत्कर्ष शिंदेचं गिफ्ट काय आहे?

सूरज चव्हाणला रितेश देशमुखकडून गिफ्ट मिळालं नसलं तरी उत्कर्ष शिंदेकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. उत्कर्ष शिंदेने जाताना सूरजसाठी एक मोठी संधी दिली. तो म्हणाला, “जान्हवी गिफ्ट मिळालं, अंकिताला मिळालं, डीपी दादा मिळालं, वैभवला मिळालं, पण सूरजला काय हवंय? मी आता आलोच आहे. तर मी तुला भाऊ म्हणून एक गिफ्ट देतो. तुझ्यासाठी आम्ही शिंदेशाही कुटुंब एक गाणं बनवू आणि जे तू कोंबडी पळालीवर केलं होतंस ते गाणं आनंद शिंदे गातील. एवढंच नव्हे तर तू त्या गाण्यात अभिनय पण करशील.”

हेही वाचा – दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट, बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा होतोय वर्षाव

हेही वाचा – Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने दिलेले खास गिफ्ट्स पाहून स्पर्धकांचे डोळे पाणावले, पाहा नवा प्रोमो

दरम्यान, रविवार झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर आणखी एक मोठी गोष्ट घडली. ते म्हणजे ‘बिग बॉस’ घरात वाइल्ड कार्डची एन्ट्री झाली. संग्राम चौगुले असं नव्या स्पर्धकाचं नाव आहे. त्यामुळे आता संग्राम कोणत्या टीमबरोबर खेळणार? की एकटाच खेळणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.