Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात निक्की अन् अरबाजच्या प्रेमाचे वारे वाहू लागले होते. अरबाजने निक्कीसाठी खास टोमॅटोचं हृदय देखील बनवलं होतं. अगदी रितेश देशमुखसमोर अरबाजने निक्कीला "तुला घरात फक्त मीच दिसेन इतर कोणीही नाही दिसणार" असं सांगितलं होतं. या दोघांनंतर आता 'बिग बॉस'च्या घरातील रांगडा गडी प्रेमात पडल्याच्या चर्चा चालू झाल्या आहेत. याचा प्रोमो 'कलर्स मराठी' वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता वैभव चव्हाण 'परदेसी गर्ल'च्या प्रेमात पडल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. वैभव इरिनाला म्हणतो, "कालपेक्षा आज जरा तू जास्त सुंदर दिसतेय…तुझ्याकडे पाहून मला असं खूप Important फिल होतंय." यावर जान्हवी त्याला म्हणते, "अरे काय चाललंय तुझं…फॉरेनची पाटलीण मस्तच हा" हेही वाचा : “कपूर घराण्यातील सुनांना…”, मुमताज यांनी सांगितलं शम्मी कपूर यांच्याशी लग्न न करण्याचं कारण, आठवणीत झाल्या भावुक रांगडा गडी पडलाय परदेसी गर्लच्या प्रेमात "रांगड्या मातीत खुलतंय परदेसी प्रेमाचं रोपटं… आपल्या मातीतला रांगडा गडी पडलाय का परदेसी गर्लच्या प्रेमात?" असं कॅप्शन देत 'कलर्स मराठी' वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. वैभव निक्कीच्या टीममध्ये असल्याने काही प्रेक्षकांनी इरिनाला वैभवपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. "हा निक्की अरबाजचा बैल आहे", "इरिना याच्या नादाला लागू नकोस", "रांगडा गडी नव्हे तो बैल आहे", "वैभवला सगळ्यात आधी नॉमिनेट करा" अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत. हेही वाचा : वादग्रस्त शोमध्ये लग्न अन् फक्त दोन महिन्यात घटस्फोट; प्रसिद्ध अभिनेत्री नंतर पायलटच्या प्रेमात पडली पण… हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रात्री कोणाच्याही अंथरुणात जाणं…”, निक्की अन् टीमची ‘ती’ कृती पाहून मराठी अभिनेत्री संतापली, पोस्ट शेअर करत म्हणाली… बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) फोटो सौजन्य : कलर्स मराठी दरम्यान, आता लवकरच 'बिग बॉस'च्या ( Bigg Boss Marathi ) घराला यंदाच्या सीझनचा पहिला कॅप्टन मिळणार आहे. यासाठी घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हा टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये पुन्हा एकदा घरातील दोन्ही गट एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याचं पाहायला मिळेल. आता घराचा पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्या 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे.