Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि वैभव चव्हाण घराबाहेर गेले. निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे आर्याला घराबाहेर काढण्यात आलं. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी वैभव एलिमिनेट झाला. यावेळी अरबाज व जान्हवी ढसाढसा रडताना पाहायला मिळाले. त्यानंतर मॅच्युअल फंडचा कॉइन वैभवने अरबाज व जान्हवीला दिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर सध्या वैभव विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना दिसत आहे.

अलीकडेच वैभवने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने एकंदरीत त्याच्या खेळाविषयी सांगितलं. तसंच आपलं काय चुकलं? कोण कसं आहे? याबद्दलही बोलला. निक्कीच्या वागण्याविषयी त्याने आपलं परखड मत मांडलं.

हेही वाचा – Video : बीबी करन्सीच्या टास्कमध्ये अभिजीत सावंतने केली गडबड, घरातील सदस्यांसह ‘बिग बॉस’नेही घेतली त्याची फिरकी

मुलाखतीमध्ये वैभवला विचारलं गेलं की, निक्कीच्या वागण्याचा घरात किती त्रास होतो? त्यावर वैभव म्हणाला, “खूप जास्त. म्हणजे मी तर तिला तोंडावर बऱ्याचदा बोललो आहे. मी जेवढ्या लांब राहायचा प्रयत्न केलाय. तेवढ्या लांब तिच्यापासून राहिलो. मी वैयक्तिकरित्या तिला बोललोय. तुझं आणि माझं पटणार नाहीये. तू माझ्याशी बोलू नको. तुला जर माझ्याशी नीट बोलायचं असेल तरच तू माझ्याशी बोलू शकतेस. नाहीतर तुझा आणि माझा ३६चा आकडा आहे, असं मी थेट तिला बोललोय. हे मी तिला तिसऱ्या, चौथ्या आठवड्यातच बोललो. अरबाजला पण बोललो होतो. माझं आणि तिचं पटणार नाही. तुला तिच्याबरोबर काय करायचं आहे ते कर. तुला जो काही गेम प्लॅन करायचा आहे तो कर. पण मला यात सामील करू नकोस.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?

पुढे वैभव म्हणाला, “जेव्हा ती खूप बडबड करते तेव्हा नक्कीच खूप त्रास होतो. पण तिचा मूळ स्वभाव ओळखणं खूप कठीण आहे. कोण खरं आहे कोण खोटं आहे? कोण कशासाठी करतंय हे माहित नाही. पण झालंय असं माझंच सगळं दिसलंय की हा चुकलाय तर चुकलाय. याने माती खाल्लीये तर खाल्लीये. भावुक झालाय तर झालाय. माझ्या चेहऱ्यावर हे दिसत. आता मला माहीत नाही लोक कसे प्रतिक्रिया देतील. जर नकारात्मक असेल तर मी म्हणणार नाही माझ्याबद्दल सकारात्मक विचार करा. ठीक आहे नकारात्मक विचार ठेवा. ते तुमचं मत आहे. तुम्ही बिनधास्तपणे तुमचं मत मांडू शकता. जिथे तुम्हाला वाटतोय मी चुकलोय तिथे मी पण मान्य करेन मी चुकलोय. जर तुम्हाला मी योग्य खेळलोय वाटतंय, तर मी म्हणणे ठीक आहे मी योग्य आहे. पण मला लोकांचं मत मॅटर करतं.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi: सूरज चव्हाणला पाण गेंडा ओळखताना आले नाकीनऊ; सर्व सदस्यांना झालं हसू अनावर, पाहा व्हिडीओ

‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.