Bigg Boss Marathi Season 6 Grand Finale Winner Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा शंभर दिवसांचा खेळ अखेर पूर्ण झाला आहे. यावर्षी तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद या पाच सदस्यांनी टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली होती. या पाचही जणांना संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून व्होटिंग करण्यात आलं. मात्र, अखेरीस या खेळात तन्वी कोलतेने बाजी मारली आहे.

‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती ठरली आहे तन्वी कोलते. तर राकेश बापट यंदाच्या सीझनचा उपविजेता ठरला आहे. तन्वीला हा शो जिंकल्यावर ‘बिग बॉस मराठी’कडून ट्रॉफी आणि १५ लाखांचा चेक देण्यात आला आहे.

यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना ‘काटा’ आणि ‘टोळी’ असे दोन ग्रुप्स पाहायला मिळाले होते, आणि तन्वीने हा शो जिंकल्यामुळे ‘काटा ग्रुप’ने या खेळात बाजी मारली आहे. ग्रँड फिनालेला आधी शोमधून एलिमिनेट झालेले सदस्य सुद्धा उपस्थित होते. तसेच ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या निमित्ताने यावर्षी ग्रँड फिनालेला जिनिलीया देशमुख व अभिषेक बच्चन हे दोन लोकप्रिय बॉलीवूड कलाकार देखील उपस्थित होते.

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनच्या ग्रँड फिनालेची प्रत्येक अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Bigg Boss Marathi Season 6 Contestants Updates :

00:39 (IST) 20 Apr 2026

BBM Winner : कोकणकन्या तन्वी कोलते ठरली विजेती! रितेश देशमुखने दिली 'ही' खास भेट, ट्रॉफी जिंकल्यावर म्हणाली, "माझं नाव…"

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : तन्वी कोलतेने जिंकली 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी, दुसऱ्या स्थानी आहे 'हा' स्पर्धक ...वाचा सविस्तर
23:11 (IST) 19 Apr 2026
Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलते जिंकली! उपविजेता ठरला 'हा' सदस्य, जिंकले तब्बल 'इतके' लाख

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे तन्वी कोलते. तर, राकेश बापट उपविजेता ठरला आहे. तन्वीवा १५ लाखांचा चेक देण्यात आला आहे.

22:34 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi : टॉप-२ स्पर्धक ठरले! तन्वी कोलतेबरोबर Safe कोण झालं?

Bigg Boss Marathi Season 6 Top 3 : 'बिग बॉस मराठी'च्या शोचे टॉप २ स्पर्धक ठरले आहेत राकेश बापट आणि तन्वी कोलते. तिसऱ्या क्रमांकावर बाद झाला आहे विशाल कोटीयन.

https://www.instagram.com/p/DXUh4rXDSKi/

22:22 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 LIVE : चौथ्या स्थानी बाद झाली 'ही' सदस्य! टॉप ३ कोण आहेत?

अनुश्री माने चौथ्या स्थानी बाद झाल्यामुळे यंदाचे टॉप ३ स्पर्धक ठरले आहेत तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटीयन

22:02 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 - चौथ्या स्थानी एलिमिनेट झाली अनुश्री माने

Bigg Boss Marathi 6 - चौथ्या स्थानी एलिमिनेट झालीये अनुश्री माने.

https://www.instagram.com/p/DXUe5XUDRdD/

21:05 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 : पाचव्या स्थानी बाद झाली दिपाली सय्यद! पैशांची बॅग कुणी घेतली?

Bigg Boss Marathi 6 : दिपाली सय्यद पाचव्या स्थानावर एलिमिनेट झाली आहे. याशिवाय रितेश देशमुखने सगळ्या सदस्यांना पाच लाख रुपयांची सुटकेस ऑफर केली होती. पण, यावर्षी कोणीही ही मनी बॅग घेऊन बाहेर आलेलं नाहीये.

https://www.instagram.com/p/DXUYPX2CKcW/

20:22 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 : महाअंतिम सोहळ्याला 'ही' स्पर्धक गैरहजर

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला प्राजक्ता शुक्रे गैरहजर राहिली आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त अभिनेत्री या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नसल्याचं तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/DXTpAp2CYhx/

याशिवाय रुचिता जामदार सुद्धा प्रोमोमध्ये दिसत नाहीये, त्यामुळे ती सुद्धा सोहळ्याला उपस्थित राहिली नसल्याची शक्यता आहे. पण, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

20:12 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 - रितेश देशमुखने दिवंगत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना वाहिली श्रद्धांजली

17:18 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 : पाचव्या स्थानी कोण एलिमिनेट होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिपाली सय्यद पाचव्या स्थानी एलिमिनेट झाल्याचं बोललं जात आहे. आता शो सुरू झाल्यावर याबाबतची अधिकृत अपडेट समोर येईल.

17:14 (IST) 19 Apr 2026

Bigg Boss Marathi 6 : पैशांची बॅग घेऊन राकेश बापटने गेम सोडला? प्रोमो पाहून बसेल धक्का

https://www.instagram.com/p/DXTHqFdiEne/

17:04 (IST) 19 Apr 2026
Bigg Boss Marathi 6 : घरी वहिनीचा धक्का आहे...! शोमध्ये जिनिलीया देशमुख व अभिषेक बच्चन यांची उपस्थिती

संस्कृती साळुंके जिनिलीयाला प्रश्न विचारत म्हणाली, "घरी असा कोणता धक्का पार पडतो का? आणि तिकडे होस्ट कोण असतं?"

यावेळी जिनिलीया हसत-हसत म्हणाली, "आमच्या घरी फक्त वहिनीचा धक्का असतो. अहो बरोबर ना?" पत्नीचं हे उत्तर ऐकून रितेश सुद्धा काहीसा लाजला. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/DXT6qCQDXJC/

17:03 (IST) 19 Apr 2026
BBM 6 Grand Finale च्या संध्याकाळी रितेश भाऊंचा दमदार Performance वाढवणार आणखीन रंगत...

https://www.instagram.com/p/DXTzcjJDQA6/

17:02 (IST) 19 Apr 2026
Bigg Boss Marathi 6 Top 5 Finalist : ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारे टॉप-५ सदस्य कोण आहेत?
  • शेरनी - अनुश्री माने
  • क्वीन ऑफ बिग बॉस - तन्वी कोलते
  • रणरागिणी - दिपाली सय्यद
  • मास्टरमाइंड - विशाल कोटीयन
  • जेंटलमन - राकेश बापट
  • https://www.instagram.com/p/DXTPOxECFom/?img_index=1

    16:59 (IST) 19 Apr 2026

    Bigg Boss Marathi 6 Grand Finale : 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले लाइव्ह कुठे पाहाल?

    Bigg Boss Marathi 6 Grand Finale : 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना लाइव्ह कलर्स मराठी वाहिनी आणि जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे. आज रात्री ८ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.

    https://www.instagram.com/p/DXTrtpfjfEA/

    'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि राकेश बापट या पाच स्पर्धकांपैकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर सहाव्या सीझनची ट्रॉफी तन्वी कोलतेने जिंकली आहे.