Bigg Boss Marathi Grand Premiere Contestant List, 11 January 2026 : भाऊचा धक्क्यावर पुन्हा एकदा त्याच जोशात ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे. रितेश देशमुखच्या उपस्थितीत हा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला आहे. यावर्षी घरात कोणकोणते सेलिब्रिटी एन्ट्री घेणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर घरात एन्ट्री घेतलेल्या १७ स्पर्धकांची नावं सर्वांसमोर उघड झालेली आहेत. यावर्षी ‘बिग बॉस मराठी’ची थीम आहे दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार. यानुसार घरात एन्ट्री घेताना स्पर्धकांना दोनपैकी एका प्रवेशद्वाराची निवड करायची होती. काही स्पर्धकांनी शॉर्टकटचं दार निवडलंय, तर काही मेहनतीचा मार्ग स्वीकारला आहे. वाचा १७ स्पर्धकांची नावं…

‘हे’ आहेत ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे १७ स्पर्धक

१. दिपाली सय्यद – शॉर्टकट दार
२. सागर कारंडे
३. सचिन कुमावत
४. सोनाली राऊत – शॉर्टकट दार
५. तन्वी कोलते – शॉर्टकट दार
६. आयुष संजीव
७. करण सोनावणे – शॉर्टकट दार
८. प्रभु शेळके उर्फ डॉन
९. प्राजक्ता शुक्रे – शॉर्टकट दार
१०. रुचिता जामदार – शॉर्टकट दार
११. अनुश्री माने
१२. राकेश बापट
१३. रोशन भजनकर
१४. दिव्या शिंदे
१५. राधा पाटील
१६. ओमकार राऊत
१७. विशाल कोटीयन

Live Updates

Bigg Boss Marathi 6 Grand Premiere : 'बिग बॉस मराठी ६' च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी...

22:45 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 - किती स्पर्धकांनी शॉर्टकट दार निवडलं?

यंदा शोमध्ये सहभागी झालेल्या १७ स्पर्धकांपैकी फक्त सहा स्पर्धकांनी शॉर्टकट दार निवडलं आहे.

22:35 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : ओमकार-विशालने कोणत्या दारातून घरात एन्ट्री घेतली?

Bigg Boss Marathi 6 : ओमकार-विशाल या दोघांनी घरात मेहनतीच्या दारातून एन्ट्री घेतली आहे.

22:34 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा १७ वा स्पर्धक आहे...

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा १७ वा स्पर्धक आहे विशाल कोटीयन.

22:32 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 चा सोळावा स्पर्धक आहे...

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा सोळावा स्पर्धक आहे ओमकार राऊत

22:24 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 : नृत्यांगना राधा पाटीलची घरात एन्ट्री!

'कातिलो की कातिल' राधा पाटीलची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, तिने शोमध्ये एन्ट्री घेताना मेहनतीच्या दरवाजाच्या निवड केली आहे.

https://www.instagram.com/p/DTYMDFRDTdy/

22:18 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री चौदावी स्पर्धक आहे...

घरात एन्ट्री चौदावी स्पर्धक दिव्या शिंदे! तिने मेहनतीच्या दाराने घरात एन्ट्री घेतली आहे.

22:08 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा १३ वा स्पर्धक आहे...

बिग बॉस मराठीचं घर गाजवायला आला आहे, अमरावतीचा गडी, देशी बॉडीबिल्डर, सोशल मीडिया स्टार रोशन भजनकर!

https://www.instagram.com/p/DTYJnCSDVaQ/?hl=en

22:03 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा १२ वा स्पर्धक आहे राकेश बापट

राकेश बापटने घरात एन्ट्री घेताना मेहनतीचं दार निवडलं आहे. राकेशच्या करिअरची सुरुवात हिंदी सिनेमातून झाली होती, त्याचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

21:57 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : हिंदी सिनेमा गाजवणारा मराठमोळा सुपरस्टार बिग बॉसच्या घरात, कोण आहे 'तो'?

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेता राकेश बापटची बिग बॉसच्या घरात दणक्यात एन्ट्री

https://www.instagram.com/p/DTYIUUmgVU-/?hl=en

21:50 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारी दहावी स्पर्धक आहे रुचिता जामदार

https://www.instagram.com/p/DTYHWKojcPr/?hl=en

21:43 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : नववी स्पर्धक आहे प्राजक्ता शुक्रे

प्राजक्ता शुक्रेने घरात एन्ट्री घेण्यासाठी शॉर्टकटचं दार निवडलं आहे.

https://www.instagram.com/p/DTYGYCsiTZP/?hl=en

21:40 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : नवव्या स्थानी सहभागी झालीये प्राजक्ता शुक्रे

आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करणारी गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना 'इथून धक्का, तिथून धक्का' द्यायला आहे रेडी आहे…

https://www.instagram.com/p/DTYGMY7jZ1T/?hl=en

21:35 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 - करण आणि प्रभू यांनी कोणतं दार निवडलं?

Bigg Boss Marathi 6 - करण सोनावणे याने शॉर्टकट दार निवडलं आहे तर, प्रभू शेळकेने मेहनतीचं दार निवडलं आहे.

21:33 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा आठवा स्पर्धक आहे प्रभु शेळके

21:25 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 : सोशल मीडिया स्टारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Bigg Boss Marathi 6 : फोकस इंडियन करण सोनावणे याने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

21:15 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 - आयुष संजीव व तन्वी कोलते

आयुष संजीवने घरात एन्ट्री घेण्यासाठी मेहनतीचं दार निवडलं आहे. तर, तन्वी कोलतेने घरात एन्ट्री घेण्यासाठी शॉर्टकट दार निवडलं आहे.

21:05 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 - आतापर्यंतचे सहा स्पर्धक

१. दिपाली सय्यद

२. सागर कारंडे

३. सचिन कुमावत

४. सोनाली राऊत

५. तन्वी कोलते

६. आयुष संजीव

https://www.instagram.com/p/DTYCgotgchP/?hl=en

21:03 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 - घरात पहिल्या जोडीची एन्ट्री!

Bigg Boss Marathi 6 - बिग बॉस मराठीच्या घरात आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांनी एन्ट्री घेतली आहे.

https://www.instagram.com/p/DTYCoXSgSD1/?hl=en

20:51 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : सोनाली राऊतने घरात एन्ट्री घेतल्यावर शॉर्टकटचं दार निवडलं आहे.

सोनाली राऊत यापूर्वी बिग बॉसच्या हिंदी सीझनमध्ये सुद्धा सहभागी झाली होती. आता ती पुन्हा एकदा बिग बॉसचं घर गाजवण्यासा सज्ज झाली आहे. तिने शॉर्टकट दाराची निवड केली आहे.

20:47 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारी चौथी स्पर्धक आहे...

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात सुपर मॉडेल सोनाली राऊतने एन्ट्री घेतली आहे.

https://www.instagram.com/p/DTYAiCCAZl3/?hl=en

20:42 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : सचिन कुमावतने कोणतं दार निवडलं?

Bigg Boss Marathi 6 : सचिन कुमावतने घरात एन्ट्री घेण्यासाठी मेहनतीचं दार निवडलं आहे.

20:37 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घरात एन्ट्री घेणारा तिसरा स्पर्धक आहे सचिन कुमावत.

बिग बॉस मराठीच्या घराला खान्देशी तडका द्यायला आलेत गायक सचिन कुमावत…

https://www.instagram.com/p/DTX-zv9gbuW/?hl=en

20:33 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : सागर कारंडेने कोणता दरवाजा निवडला?

Bigg Boss Marathi 6 : सागर कारंडेने घरात एन्ट्री घेण्यासाठी मेहनतीचं दार निवडलं आहे.

20:23 (IST) 11 Jan 2026
Bigg Boss Marathi 6 - पहिली स्पर्धक आहे दिपाली सय्यद

Bigg Boss Marathi 6 - दिपाली सय्यदने घरात एन्ट्री घेण्यासाठी शॉर्टकटचा दरवाजा निवडला आहे. त्यामुळे तिला 'पॉवर की' मिळाली आहे.

20:14 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात यंदा असणार उलटा-पुलटा रूम

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात यावर्षी उलटा-पुलटा रूम असणार आहे. या रूमचा रस्ता लिव्हिंग रूममधील छोट्याशा खोलीतून पुढे जातो.

20:07 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात यंदा असणार दोन दार! नेमका ट्विस्ट काय वाचा...

Bigg Boss Marathi 6 - 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेण्यासाठी यंदा दोन दार असणार आहेत. एक असेल शॉर्टकटचं दार अन् दुसरं असेल मेहनतीचं दार. आता स्पर्धकांना सुद्धा यापैकी एका द्वाराची निवड करावी लागणार आहे. आता सहभागी होणारे स्पर्धक यापैकी कोणतं दार निवडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

20:03 (IST) 11 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 - भाऊंच्या एन्ट्रीने ग्रँड प्रीमियरला दणक्यात सुरुवात

रितेश देशमुखने मंचावर ग्रँड एन्ट्री घेतली असून, यंदाच्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 या नव्याकोऱ्या सीझनला सुरुवात झालेली आहे. यंदाही या शोचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी झालेत जाणून घ्या...