Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक आता जबरदस्त खेळताना दिसत आहेत. दर आठवड्याला जरी घरातली समीकरणं बदलत असली तरी खेळात मात्र प्रत्येक जण आपल्या ताकदीने आणि युक्तीने दमदार खेळत आहेत. यापैकी एक म्हणजे पंढरीनाथ कांबळे. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात खेळात दिसत नसल्यामुळे रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेला झापलं होतं. “यंदा ‘बिग बॉस’नं एका प्रेक्षकाला या घरात एन्ट्री दिलेली आहे. ते लपून छपून तुमचा खेळ पाहत आहेत. पण स्वत: काहीच करत नाहीयेत. ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे,” अशा शब्दात वर्णन करत रितेशने पंढरीनाथला चांगलंच सुनावलं होतं. यानंतर पंढरीनाथच्या खेळात बरीच सुधारण झाली आणि तो आता जबरदस्त खेळताना दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये पंढरीनाथ कांबळेचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्कमध्ये पंढरीनाथने अरबाज-वैभवला चांगलंच पळवलं. तसंच ‘जादुई हिरा’च्या टास्कमध्ये निक्कीला पंढरीनाथने भन्नाट उत्तर दिली. एकंदरीत तो निक्कीवर शाब्दिक वार करताना दिसला. त्याचा याच खेळाचं कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधवनंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने केलं आहे.

हेही वाचा – ‘मन धागा-धागा जोडते नवा’ फेम मयुरी देशमुखला गणेशोत्सवातील ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही, म्हणाली, “माझ्या घरात…”

अभिनेत्री विशाखा सुभेदारने नुकतीच सोशल मीडियावर पंढरीनाथच्या खेळाचं कौतुक करण्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. पंढरीनाथ कांबळेचा फोटो शेअर करत विशाखाने लिहिलं आहे, “काल काय जोरदार खेळ रंगला… अंदाजे तुझं वय वर्षे ५२ असावं…पण बाबो…त्यांना कसलं पळवलं आहेस…मज्जा आली… तू बहारदार खेळला आहेस.. पॅडी कांबळे…निक्कीची टकळी सुरू असताना तू जे उत्तर देतोस नं तिला त्यानंतर काय बोलावं ते सुचत नाही…अभी तो खेल शुरु हुआ हैं…”

हेही वाचा – Video: सूरज चव्हाणला येतेय गावची आठवण, म्हणाला, “मी साधा आणि सनकी आहे, पण इथे…”

“पॅडी म्हणजे सबा डॅडी”

विशाखाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ताईसाहेब बरोबर बोललात. पॅडी म्हणजे सबा डॅडी. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “पॅडी दादा थकवून आणि टोमणे मारून धुतो.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “पॅडी दादाला टॉप-३मध्ये बघायला आवडेल.”

दरम्यान, याआधीही विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या होत्या. जेव्हा जान्हवीने पंढरीनाथचा अपमान केला होता. तेव्हा देखील विशाखाने सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे जान्हवीला सुनावलं होतं.