Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजपासून आठवा आठवडा सुरू होणार आहे. घरात पहिल्याच दिवशी सर्व प्रेक्षकांना नॉमिनेशनची लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या आठवड्यात आर्या आणि वैभव असे दोन सदस्य घराबाहेर गेल्याने आता फक्त १० सदस्य उरले आहेत. त्यामुळे हा खेळ दिवसेंदिवस कठीण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य टास्क नसताना मोकळ्या वेळेत मजा-मस्ती करताना दिसतात. अगदी ‘बिग बॉस’ सुद्धा सदस्यांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतात. सूरज चव्हाणचा असाच एक व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे.

‘गुलीगत धोका’ फेम सूरज चव्हाण सध्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सूरजचा साधेपणा, त्याची गेम खेळण्याची पद्धत, कोणत्याही स्ट्रॅटेजीशिवाय नि:स्वार्थीपणे सर्वांना केलेली मदत या गोष्टींमुळे अल्पावधीतच सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सूरजचं शिक्षण झालेलं नसल्याने अनेकदा ‘बिग बॉस’शी संवाद साधताना त्याला अडचणी येतात. याशिवाय टास्क दरम्यान त्याला गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. आता ‘बिग बॉस’ने सूरजची फिरकी कशी घेतात पाहूयात…

हेही वाचा : “ते घर, आतली परिस्थिती…”, Bigg Boss Marathi चा ‘तो’ एपिसोड पाहून अभिनेता झाला भावुक; म्हणाला, “कोणत्याच सदस्याबद्दल…”

‘बिग बॉस’ने घेतली सूरजची फिरकी

“सूरज मी असं ऐकलंय की, आपल्याला एक मैत्रीण हवीये…तुम्हाला कशी मैत्रीण हवीये सांगा” असं ‘बिग बॉस’ त्याला विचारतात. ‘बिग बॉस’चा प्रश्न ऐकल्यावर सूरज प्रचंड लाजतो. यावर निक्की, “पोरगा लाजला…” असं देखील म्हणत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

सूरज सांगतो, “बिग बॉस’ चांगला स्वभाव पाहिजे. साडी नेसणारी पोरगी पाहिजे.” यावर अभिजीत म्हणतो, “अरे मैत्रीण कशी हवीये विचारतात हे लग्नाचं प्रपोजलच देतोय तू…” यानंतर घरात एकच हशा पिकतो. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : अवघ्या पाच महिन्यांनंतर स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिजीत सावंत – सूरज चव्हाण ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरमध्ये बिनसलं, डीपी नाराजी व्यक्त करत म्हणाला, “आता बास झालं…”

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, आजच्या भागात घराबाहेर होण्यासाठी कोण नॉमिनेट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.