Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये निक्की पॅडीला ‘जोकर’ म्हणाली होती. तर, हा टास्क संपल्यावर जान्हवीने पॅडीच्या अभिनयावर बोट ठेवत त्याचा अपमान केला होता. जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती.

नेटकऱ्यांसह मराठी कलाकार जान्हवीवर टीका करत आहेत. अनेकांनी ‘कलर्स मराठी’, रितेश देशमुख यांना टॅग करत येत्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला अद्दल घडवण्याची मागणी केली होती. अखेर भाऊचा धक्का सुरू झाल्यावर रितेशने प्रेक्षकांचं म्हणणं खरं करून दाखवलं. संतापलेल्या रितेशने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही आतापासून तुमची जागा बाहेर असं म्हणत जेलमध्ये टाकलं.

Durga
अभिषेक अन् दुर्गा अडकणार लग्नबंधनात; मालिकेत येणार नवीन वळण
Dhananjay Powar
Video: “कमाई…”, असे म्हणत धनंजय पोवारने शेअर केला…
tharla tar mag arjun gives open challenge to mahipat shikhare
ठरलं तर मग : सायली-मधुभाऊंना धक्का! केसचा निकाल महिपतच्या बाजूने, पण ऐनवेळी अर्जुन घेणार ‘तो’ निर्णय, पाहा प्रोमो
actor Namish Taneja father died of heart attack (1)
प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांना राम-लीला सादर करताना आला हृदयविकाराच्या झटका, उपचारादरम्यान दुसऱ्या झटक्याने झालं निधन
suraj chavan bigg boss marathi winner aware fans about financial fraud
Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणच्या नावाने लुबाडणूक; प्रकरण उघडकीस आल्यावर चाहत्यांना स्वत: केली विनंती, म्हणाला…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अंकिताने सांगितला किस्सा, म्हणाली…
Hina Khan
केमोथेरपीचे परिणाम, कॅन्सरग्रस्त हिना खानने शेअर केला डोळ्याचा फोटो; म्हणाली, “ही एक पापणी…”
suraj chavan meets ajit pawar after he won bigg boss marathi
“झापुक झुपूक बच्चा…”, Bigg Boss विजेत्या सूरजची डायलॉगबाजी ऐकून अजित पवारांना हसू अनावर; व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 18 First Elimination
Bigg Boss 18: बिग बॉसला पहिल्याच आठवड्यात अडचणीत आणणारा सदस्य घराबाहेर, कोण आहे तो? जाणून घ्या

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “मी रितेश देशमुख आहे! मला हलक्यात…”, अरबाजला दिली सक्त ताकीद; नेमकं काय घडलं?

जान्हवीसाठी ‘बिग बॉस’च्या घरातील गार्डन परिसरात जेल उभारण्यात आला आहे आणि रितेशने दिलेल्या आदेशानुसार आता पुढचा आठवडा जान्हवीला या जेलमध्ये राहावं लागणार आहे. तिला चांगलीच अद्दल घडवल्याने अभिनेत्री व ‘बिग बॉस’च्या यापूर्वीच्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी याबद्दल रितेशचं भरभरून कौतुक केलं आहे.

सुरेखा कुडची यांची पोस्ट

लव्ह यू रितेश भाऊ…

आज शांतपणे झोप लागेल… भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत… प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्या… त्याबद्दल धन्यवाद… याचीच वाट पाहत होतो… घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण, जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं..

तुम्ही जेव्हा म्हणालात की, अरबाज – निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही. ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर लई भारी “मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं…”

‘ए’ टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं… आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलंत… बाकी ‘बी’ टीमची तारीफ करावी असंच ते खेळले आहेत… असा भाऊचा धक्का पाहायला नक्की आवडेल… love you ritesh bhau

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवीला टाकलं जेलमध्ये! “तुमची जागा बाहेर”, म्हणत रितेश देशमुखने केली मोठी शिक्षा; संतापून म्हणाला, “यापुढे…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

दरम्यान, आता जान्हवीला दिलेली शिक्षा कधीपर्यंत चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय इरिना, अभिजीत सावंत, आर्या जाधव आणि वैभव चव्हाण या नॉमिनेटेड सदस्यांपैकी घराबाहेर कोण जाणार हे आजच्या ( २५ ऑगस्ट ) भागात स्पष्ट होणार आहे.