Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज हे ‘टीम ए’चे सदस्य त्यांनी घरात केलेली भांडणं, चुकीची वक्तव्य यामुळे चर्चेत आहेत. वर्षा उसगांवकरचा अपमान, याशिवाय पॅडीला ‘जोकर’ म्हटल्यामुळे मध्यंतरी सोशल मीडियावर निक्की विरोधात संतापाची लाट उसळली होती. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या आधीच्या पर्वातील अनेक कलाकारांनी निक्कीवर नाराजी व्यक्त केली होती.

वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वावर भाष्य केल्याने निक्कीला घराच्या बाहेर काढा असं देखील नेटकऱ्यांनी म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर ‘कलर्स मराठी’च्या पोस्टवर अशा कमेंट्स देखील करण्यात येत होत्या. मराठी मनोरंजन विश्वातील आणि ‘बिग बॉस’च्या पर्वात याआधी सहभागी झालेले कलाकार सुद्धा निक्कीप्रकरणी सध्या व्यक्त होत आहेत. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी काही दिवसांपूर्वी ‘अल्ट्रा बझ मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी निक्कीचा खेळ आणि घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोणत्या सदस्याने जावं याबाबत आपलं मत मांडलं होतं.

हेही वाचा : “खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”

Bigg Boss Marathi – काय म्हणाल्या सुरेखा कुडची?

सुरेखा कुडची म्हणाल्या, “निक्की व जान्हवी या दोघींना शांत करण्यासाठी आणि यांना त्या पातळीवर जाऊन बोलण्यासाठी राखी सावंत ही योग्य व्यक्ती आहे. निक्कीला शांत ठेवण्यासाठी मराठीत मला तरी अजून कोणी असं दिसत नाही. जे यांच्याशी त्या लेव्हलला जाऊन भांडू शकतात. यांच्या वरचढ जर कोणी असेल तर ती राखी सावंतच आहे.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “दुसरी गोष्ट म्हणजे, अरबाज-वैभवसारख्या बलदंड लोकांबरोबर आत भिडण्यासाठी जय हवा. जयला पुन्हा एकदा घरात पाहायला मला नक्कीच आवडेल. त्याची एन्ट्री झाली, तर मला खूप आवडेल.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “…तर घाणेरडी राहा”, आर्या-जान्हवीमध्ये चार दिवसांच्या मैत्रीनंतर वादाची ठिणगी! दोघींनी एकमेकींना सुनावलं…; पाहा प्रोमो

अभिनेत्री सुरेखा कुडची ( Bigg Boss Marathi )

दरम्यान, सुरेखा कुडची यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्या ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) चौथ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. घरात २८ दिवस राहिल्यानंतर त्यांचा प्रवास संपला. याशिवाय छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.