Bigg Boss Marathi Captaincy Task : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या आठव्या आठवड्याच्या कॅप्टनपदासाठी टास्क सुरू आहे. यासाठी ‘बिग बॉस’कडून घरात दोन टीम करण्यात आल्या आहेत. ‘टीम ए’मध्ये अरबाज, निक्की, सूरज, वर्षा आणि धनंजय हे सदस्य आहेत. तर, ‘टीम बी’ मध्ये अंकिता, अभिजीत, संग्राम, जान्हवी आणि पॅडी हे पाच जण आहेत. आता टास्कमध्ये दोन्ही टीमपैकी कोण बाजी मारणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल. मात्र, तत्पूर्वी कोणत्या टीममधील सर्वाधिक सदस्य बाद झाले आहेत. हे प्रोमोतील एका फोटोमुळे उघड झालं आहे.

घरात आठव्या आठवड्याचा कॅप्टन होण्यासाठी सगळ्या सदस्यांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. यापैकी निक्की तांबोळी, रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर दिलेल्या शिक्षेमुळे हे पर्व संपेपर्यंत घराची कॅप्टन होऊ शकत नाही. त्यामुळे ती कोणत्याच कॅप्टन्सी कार्यात सहभागी नसते. केवळ अरबाजला मदत म्हणून सगळ्या टास्कमध्ये निक्की खेळते. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अभिजीतला बाद करण्याच्या निर्णयात निक्कीने अरबाजला साथ दिली नाही. तिने पहिल्या फेरीत पॅडी आणि अंकिताला बाद केलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: अंकिता, पंढरीनाथने निक्कीची केली हुबेहूब नक्कल, ‘बी’ टीममध्ये रंगली निक्कीच्या चालण्यावरून चर्चा

अरबाजने जान्हवी आणि संग्रामशी आधीच डील केली होती. त्यानुसार निक्कीने अंकिता-पॅडीच्या घरट्यात अंड टाकलं. यामुळे दोघंही पहिल्याच फेरीतून बाद झाले. “अभिजीतला बाद का नाही केलं?” याचा जाब विचारतास अरबाजला निक्कीने उडवाउडवीचं उत्तर दिलं. यानंतर टीमच्या विरोधात गेल्याने सगळेच निक्कीवर संतापले होते. यानंतरच्या दुसऱ्या फेरीत ‘टीम बी’मधून आणखी दोन सदस्य बाद होतील.

संग्राम आणि जान्हवी डील करूनही कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर होणार आहेत. त्यामुळे ‘टीम बी’मधून अंकिता, पॅडी, संग्राम आणि जान्हवी असे चार सदस्य कॅप्टन्सी टास्कमधून बाद झाल्याचं समोर आलं आहे.

आता फक्त ‘बी टीम’मधून अभिजीतचं कॅप्टन्सी पदाच्या स्पर्धेतील स्थान कायम आहे. त्यांच्यापैकी एकूण ४ जण कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर गेल्याने या टास्कमध्ये पुन्हा एकदा अरबाज-निक्कीची टीम बाजी मारणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, ऐनवेळी परिस्थिती बदलून ‘टीम बी’ बाजी मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा : Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Bigg Boss Marathi : टास्कमधून चार सदस्य झाले बाद

‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ यांच्यापैकी विजयी टीममधील सदस्य कॅप्टन्सीच्या अंतिम लढतीसाठी पात्र होतील. त्यामुळे घराचा कॅप्टन कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केवळ निक्कीलाच ही संधी शिक्षेमुळे मिळणार नाही.

दरम्यान, या आठवड्याबद्दल सांगायचं झालं, तर निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज आणि वर्षा हे पाच सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यांच्यापैकी कोण घरात राहणार आणि कोण बाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.