Bigg Boss Marathi Suraj Chavan And Vibhav : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाणने १९ ऑक्टोबर रोजी त्याचा ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी सूरज खास मुंबईत आला होता. यावेळी त्याने सर्वप्रथम ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंची भेट घेतली. याशिवाय शोमध्ये सहभागी झालेल्या सूरजच्या सह-स्पर्धकांनी सुद्धा त्याला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या होत्या.

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात यंदा सूरजशिवाय आणखी एक बारामतीकर सहभागी झाला होता. त्याचं नाव आहे वैभव चव्हाण. वैभवने देखील सूरजसाठी खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, हा ‘गुलीगत किंग’ मुंबईत असल्याने दोघांची भेट होऊ शकली नव्हती. अखेर ‘लेट पण थेट’ असं कॅप्शन देत वैभवने सूरजचा वाढदिवस साजरा केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : “आमचा Bigg Boss चा सीझन पुन्हा बघणार नाही, कारण…”, अंकिताचं स्पष्ट मत; महेश मांजरेकरांच्या भेटीबद्दल म्हणाली

Bigg Boss Marathi : सूरजसाठी वैभवची खास पोस्ट

वैभवने सूरजसाठी ( Suraj Chavan ) खास ‘झापुक झुपूक सूरज’ असं नाव लिहिलेला चॉकलेट केक आणला होता. या दोघांनी यावेळी एकत्र सूरजच्या हटके स्टाइलवर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. सूरजला वाढदिवस साजरा केल्यावर वैभवने खांद्यावर उचलून घेतलं होतं. या दोघांमधल्या बॉण्डिंगचं सध्या नेटकरी कौतुक करत आहेत. हे सगळे क्षण वैभवने एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वैभव लिहितो, “सूरज भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… लेट पण थेट… तुला कायम सगळ्यांनी असंच खांद्यावर उचलून धरावं आणि तू खूप यशस्वी व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना! बाकी आम्ही सगळे आहोतच तुझ्याबरोबर… जय शिवराय!”

हेही वाचा : ‘गुलाबी साडी’नंतर संजू राठोडच्या ‘काळी बिंदी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मुख्य भूमिकेतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

हेही वाचा : “काळवीटाची शिकार केली नसेल तरीही बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन…”, सलमान खानला बॉलीवूडमधून सल्ला

दरम्यान, ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) संपलं तरी दोघांमधली मैत्री कायम आहे. घराबाहेर पडल्यावर अनेक मुलाखतींमध्ये वैभवने सूरजबरोबरची मैत्री कायम ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. अगदी बोलल्याप्रमाणे तो सूरजला खंबीरपणे साथ देताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader