Bigg Boss Marathi 6 promo: बिग बॉसच्या घरात दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. कधी टास्कमध्ये, कधी कोणाच्या बोलण्याचा राग आल्यामुळे, कधी घरातील काम करण्यावरून तर कधी जेवणावरून स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसतात. अनेकदा अशा वादामुळे स्पर्धेकांमध्ये कटुता निर्माण होते.

बिग बॉस मराठीच्या ६ व्या पर्वात अनेकदा वाद -विवाद, भांडणे पाहायला मिळतात. भाऊच्या धक्क्यावरदेखील स्पर्धेकांमधील वाद, त्यांच्यात असणारी कटुता पाहायला मिळते. रितेश देशमुख स्पर्धेकांना विविध टास्क देतो. त्यामधून बिग बॉसमध्ये असणाऱ्या स्पर्धेकांचे एकमेकांबद्दलचे विचार अधिक स्पष्ट होतात.

आता कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विशाल कोटीयनचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता नेमकं काय घडलं आहे, हे जाणून घेऊ…

Award Banner

“मी असाच आहे आणि असाच राहणार…”

प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रितेश देशमुख स्पर्धेकांना सांगतो की, हा काटेरी मुकुट अशा सदस्याला द्यायचा आहे, जो स्वतःला राजा समजतो. त्यावर तन्वी व दिपाली विशालचे नाव घेतात. मी पणाचा अहंकार असलेला, असे म्हणत तन्वी आणि दिपाली विशालचे नाव घेतात.

या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, विशालचा संताप अनावर होतो. तो पंचिंग बॅगला मारत म्हणतो, “याला अहंकार नाही, स्वाभिमान म्हणतात. मी असाच आहे आणि असाच राहणार.”

नेटकरी म्हणाले..

बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कंमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “विशाल तुमच्यापेक्षा बेस्ट आहे.” दुसऱ्याने लिहिले, “दिपाली खरं बोलल्या म्हणून विशाल भडकला.” आणखी एकाने लिहिले, ” विशाल विजेता आहे तुम्ही दोघी काहीही करा. ” एकाने लिहिले, “विशाल राजा आहे आणि राजाच राहणार “, एकाने लिहिले, ” विशालला अॅटीट्यूड आहे”, अशा अनेक संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये काही विशालच्या बाजूने मत मांडले आहे तर काहींनी दिपाली आणि तन्वी बरोबर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात पुढे नेमकं काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.