Tanvi Kolte and Deepali Sayyad Dancing Together: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून अभिनेत्री तन्वी कोलतेला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने सिंचना ही भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तन्वी बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वात तिने तिच्या खेळातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ती या पर्वाची विजेती झाली.

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर तन्वी विविध व्हिडीओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच ती विविध मुलाखतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मुलाखतींतून तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल, चढ-उतारांबद्दल तसेच बिग बॉसमधील प्रवासाबद्दलही सांगितले आहे.

‘बिग बॉस ६’नंतर तन्वी कोलते ‘या’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला

आता नुकतीच ती एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘चाकरी’ असे या गाण्याचे नाव आहे. हा मुझिक व्हिडीओ आहे. प्रणित काळोखे तिच्याबरोबर दिसत आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवर हा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

आता कलाकार सोशल मीडियावर यावर रील्सदेखील करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता तन्वीचे नवीन गाणे आल्याच्या निमित्ताने दीपाली सय्यदने तन्वीची भेट घेतली आहे. दीपाली सय्यदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, दीपाली व तन्वी चाकरी या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांनी या गाण्यातील काही ओळींवर ताल धरला, त्यानंतर त्या एकमेकांना प्रेमाने मिठी मारत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तन्वीने लिहिले, “तनु उत्तम गाणे, छान छान दिसत आहेस.”

दीपाली सय्यदने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तन्वीने कमेंट करत ताई असे लिहिले आहे. तसेच, रेवा कौरसेने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत; तर प्रणित काळोखेने दोन सुंदरी एकत्र अशी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

एकाने लिहिले, “उत्तम बॉण्डिंग”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसत आहात”, तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

दरम्यान, आता तन्वी कोलते आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.