Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता तिसरा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात कोणत्याच सदस्याने या घराचा निरोप घेतला नाही. परंतु, तिसऱ्या आठवड्याची सुरुवातच भांडणांनी झाली आहे. अंकिता वालावलकर गेल्या आठवड्यात या घराची कॅप्टन असल्याने ती संपूर्ण आठवडा सेफ होती. परंतु, निक्की तिला काही केल्या कॅप्टन करण्यास तयार नव्हती. वर्षा यांच्या चुकीच्या निर्णयामुळे अंकिता कॅप्टन झाली असा आरोप निक्कीने केला. याशिवाय घरात कोणतंही काम करण्यास निक्कीने नकार दिला होता.

निक्की तांबोळी घरात स्वत:चं काम देखील करत नव्हती. त्यामुळे घरातलं वातावरण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तापलं होतं. अंकिताने, “निक्कीला तुम्ही आणि रितेश सरांनी समज द्यावी” असं ‘बिग बॉस’ला सांगितलं होतं. परंतु, ‘बिग बॉस’ने अंकिताला “तुम्ही कॅप्टन या नात्याने निर्णय घ्यायला हवा” असं स्पष्ट केलं. निक्कीच्या सामानाला साफसफाई करताना घरातील इतर सदस्यांनी हात लावल्यामुळे ती प्रचंड संतापली आणि इतर सदस्यांच्या सामानाची फेकाफेक करू लागली. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरातील दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणं झाली.

bigg boss marathi riteish deshmukh prank with ankita walawalkar
…अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Bigg Boss Marathi Abhijeet Nikki Dance Video
Video : शाहरुख-काजोलच्या सुपरहिट गाण्यावर अभिजीत-निक्कीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “ती कशीही असो पण…”
Bigg Boss Marathi Season 5 yogita Chavan appreciated to suraj Chavan
“मी सुरज चव्हाणच्या प्रेमात” म्हणत योगिता चव्हाणने भरभरून केलं कौतुक, म्हणाली, “त्याची हाक घरची वाटायची”
Bigg Boss Marathi 5
Video : “अरे तुला लाज वाटते का?” नेटकऱ्यांचा वैभव चव्हाणवर संताप; नेमकं काय घडलं?
Sandeep Khare wrote a special post on daughter Roomani Khare new serial Durga
Video: ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार संदीप खरेंची मुलगी, खास पोस्ट करत म्हणाले, “लाडक्या लेकीची दुसरी मालिका…”
riteish deshmukh slams vaibhav chavan watch new promo
“घरात गद्दारी चालणार नाही…”, रितेश देशमुखने वैभवला चांगलंच झापलं; ‘ही’ गोष्ट ठरली कारण, पाहा वीकेंडचा जबरदस्त प्रोमो
arbaz patel is the new captain of the house but netizens praises suraj chavan
Bigg Boss Marathi : अरबाज पटेल झाला नवा कॅप्टन! पण, कौतुक होतंय ‘गुलीगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणचं! नेमकं काय घडलं?

हेही वाचा : “साऊथचे कलाकार शिस्तप्रिय अन्…”, तेजस्विनी पंडितने सांगितला अनुभव; दाक्षिणात्य चित्रपटातील जबरदस्त लूक आला समोर

योगिता चव्हाणला अश्रू अनावर

बेडरुममध्ये भांडणं सुरू असताना योगिता बाहेर येऊन थांबली. यानंतर ‘बिग बॉस’ने ( Bigg Boss ) तिला कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतलं. यावेळी योगिताने या सगळ्या भांडणांचा प्रचंड त्रास होत असल्याचं सांगितलं. तसेच नियम मोडणाऱ्या लोकांना ‘कृपया तुम्ही शिक्षा द्या’ असंही तिने सांगितलं. परंतु, ‘बिग बॉस’ने “मी केवळ मूलभूत नियमांचं उल्लंघन केल्यास बोलू शकतो” असं अभिनेत्रीला सांगितलं. “जे तुम्हाला चुकीचं वाटतं तिथे तुम्ही बोललं पाहिजे” असंही ‘बिग बॉस’ योगिताला म्हणाले.

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss ) कन्फेशन रुममध्ये योगिताने हतबल होऊन, ढसाढसा रडत हा गेम आणि या वातावरणात राहणं मला शक्य नाही असं सांगितलं. तसेच अभिनेत्रीने ‘बिग बॉस’कडे घरी सोडण्याची शिफारस देखील केवी आहे. घरातील काही स्पर्धकांच्या दादागिरीला कंटाळून या निर्णयावर पोहोचल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. तसेच “तुम्ही टीमशी बोलून निर्णय घ्या… मी स्वत:ला एक आठवडा दिला इथून पुढे मी सहन करू शकत नाही.” असंही योगिताने सांगितलं.

हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : पहिलं गाणं प्रदर्शित! सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने धरला ठेका; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

yogita
Bigg Boss Marathi : योगिता चव्हाण ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

योगिता चव्हाण या आठवड्यात देखील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट आहे. आता भाऊच्या धक्क्यावर अभिनेत्रीबाबत काय निर्णय घेतला जाणार हे येत्या वीकेंडला स्पष्ट होईल.