Bigg Boss OTT Fame Actress New Home : मुंबई या स्वप्ननगरीत अनेक जण आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक जण मेहनतही करीत असतो. सामान्यांबरोबरच कलाकार मंडळीचेसुद्धा मुंबईत घर असावे असे एक स्वप्न असते.
नुकतेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता गौरव मोरेने मुंबईत नवीन घर घेतले आहे. याचे काही फोटो सोशल मीडियारव व्हायरल होत आहेत. अशातच आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने मुंबईत घर घेण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे पलक पुरस्वानी.
गौरव मोरेनंतर पलक पुरस्वानीने मुंबईत घेतलं घर
‘बिग बॉस ओटीटी २’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पलक पुरस्वानीने मुंबईत तिचे स्वप्नातले घर खरेदी केलं आहे. तिचा होणारा पती रोहन खन्ना आणि तिने मिळून हे घर घेतलं असून, पलकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. घर घेतल्यानंतरचा हा आनंद तिने पोस्ट लिहित व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पलक म्हणते, “ज्या घराचं आम्ही फक्त स्वप्न पाहिलं होतं, ज्याबद्दल तासन् तास गप्पा मारल्या होत्या, अखेर त्या घराची किल्ली आमच्या हातात आहे. हा क्षण आमच्यासाठी एका छोट्या विजयासारखाच आहे. पहिल्या फोटोमध्ये सगळं काही स्पष्ट दिसतंय – आम्ही दोघं, हातातील किल्ली आणि डोळ्यांत साठवलेली अनेक स्वप्नं. आमच्या आयुष्यातील या नवीन प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी, सर्व सेलिब्रेशन आणि धावपळ सुरू होण्याआधी… आम्हाला या प्रवासाचा हा सुरुवातीचा टप्पा शेअर करायचा होता. हे एक असं घर असेल जिथे प्रेम, आनंद, थोडा गोंधळ आणि खूप साऱ्या आठवणी असतील.”
पुढे तिने होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणजेच रोहनबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर घेणं ही काही छोटी गोष्ट नाही… आणि जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या बरोबर असतो, तेव्हा हे यश अधिक खास वाटतं. माझ्या आयुष्याची ही सुंदर सुरुवात करण्यासाठी तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मला मिळाला नसता. रोहन, मी स्वतःला भाग्यवान समजते की तू माझ्या आयुष्यात आहेस. तू हे स्वप्न सत्यात उतरवलं आहेस. तू खरोखर एखाद्या ‘जिनी’सारखा आहेस, ज्याने माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं.”
यानंतर पलकने तिच्या चाहत्यांसाठीसुद्धा खास पोस्ट शेअर केली आहे. “आम्ही या क्षणाची खूप मनापासून वाट पाहिली आहे… आणि आता हा क्षण प्रत्यक्षात आल्यावर तुम्हीही त्याचा भाग असावं, असं आम्हाला वाटतं. या घराची प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक छोटी गोष्ट सजवताना तुम्ही आमच्याबरोबर राहा”, असं ती म्हणाली आहे.
पलक पुरस्वानीने शेअर केले मुंबईतल्या घराचे फोटो
दरम्यान, पलकने तिच्या नव्या घराची पोस्ट शेअर करताच कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. जिया शंकर, पलक सिंधवाणी, रोहित परमारसह अनेक कलाकारांनी तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कमेंट्समधून तिचे कौतुक केले आहे.
