scorecardresearch

“जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप

सनीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप
सनीसह कुटुंबातील इतर चार जणांवर त्याच्या पत्नीने आरोप केले होते.

‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या पर्वात चार सदस्यांनी वाइल्ड कार्डमधून एन्ट्री घेतली. पुण्याचे ‘गोल्डन बॉइज’ म्हणून लोकप्रिय असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर यांनी बिग बॉस १६ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. हे दोन्ही स्पर्धक मराठमोळे आहेत. बिग बॉस हिंदीच्या घरात थेट पुण्यातील मराठमोळ्या सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर त्यांची सातत्याने चर्चा होत आहे. मात्र आता सनी वाघचौरेबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सनी वाघचौरेच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळ तसंच गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

गोल्डमॅन म्हणून ओळख असलेल्या सनी वाघचौरे याच्यावर दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीने गंभीर आरोप लावले होते. त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच त्याने गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसाठी छळ केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

अंगावर किलोभर सोनं घालून तसंच गाडीला गोल्ड प्लेटिंग करून फिरणाऱ्या सनीसह कुटुंबातील इतर चार जणांवर त्याच्या पत्नीने आरोप केले होते. सनीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, “२३ मार्च २०११ ते २२ ऑक्टोबर २०२० या काळात नेहरू नगर येथील संतोषी माता मंदिर चौकाजवळील माझ्या घरात माझ्यावर अत्याचार आणि कौटुंबिक छळ करण्यात आला. सनी नाना वाघचोरे, आशा नाना वाघचोरे, नाना वाघचोरे आणि मेहुणी नीता गायकवाड हे चार जण यात सहभागी आहेत. सनीसह वाघचौरे कुटुंब सातत्याने माझ्या आई-वडिलांकडं गृहपयोगी वस्तूची मागणी करायचे.”

“तसेच तो बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन मला मारहाण करत. शिवीगाळ करुन धमकीही द्यायचा. इतकंच नव्हे तर सनीसह सासरकडच्या इतर मंडळींकडूनही अनेक वर्ष माझा छळ केला गेला. सनी वाघचौरेसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मला गर्भपाताची औषधं देत गर्भपात केल्याचा गंभीर आरोप तिने केला होता. तसेच वाघचौरे कुटुंबियांकडून मला पट्ट्यानेही मारहाण करण्यात आली होती”, असे तिने या तक्रारीत नमूद केले होते.

आणखी वाचा : “ए शेवंते…” घरात येताच राखी सावंतची अपूर्वा नेमळेकरला हाक, विकास सावंतचीही घेतली शाळा

सनीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर सनी नाना वाघचौरे, आशा नाना वाघचौरे, नाना वाघचौरे आणि नीता गायकवाड या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता गोल्ड प्लेटेड कार व मोबाइल तसंच अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा अशी सनीची ओळख आहे. तो चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना ओळखतो. यापूर्वी अनेक टीव्ही शो मध्ये तो दिसला होता. सध्या तो बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. यामुळे तो चर्चेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:05 IST

संबंधित बातम्या