Bigg Boss Marathi Fame Roshan Bhajankar’s Wife Talks About His Game : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ सुरू होऊन जवळपास दीड महिना ओलांडा. परंतु, अजूनही काही स्पर्धक चाचपडताना दिसत आहेत. काही जण सुरुवातीपासून विशिष्ट प्रकारचे गेम प्लॅनिंग करून, स्ट्रॅटेजीस आखून खेळताना दिसत आहेत. तर, काही भावनिक नात्यांमध्ये अडकताना, मैत्री जपताना दिसत आहेत. त्यामुळे इतर स्पर्धक काही वेळा त्यांचा फक्त खेळापुरता वापर करून घेतला. ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या साध्या स्वभावामुळे सर्वांच लक्ष वेधून घेणारा रोशन भजनकर यापैकीच एक आहे.

रोशन भजनकरने त्याच्या साध्या स्वभावामुळे अनेकांची मने जिंकली आहेत. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा रोशन फक्त टोळीतील सदस्य सांगतात तसेच करतो. त्यांच्यासाठी खेळतो स्वत: काही प्लॅनिंग करून आपला खेळ कसा दिसेल, आपण कसे पुढे जाऊ याचा विचार करत नाही, असे त्याला घरातील स्पर्धक आणि रितेश देशमुखसुद्धा म्हणाला आहे. अशातच आता त्याची बायको सीमा भजनकर यांनी त्याचा खेळ आणि ‘बिग बॉस’च्या घरात असलेला त्याचा वावर यांबद्दल प्रतिक्रिया देत त्याला काही सल्लासुद्धा दिला आहे.

रोशनच्या पत्नी काय म्हणाल्या?

राजश्री मराठीशी संवाद साधताना सीमा यांना रोशनला टीव्हीवर बघता तेव्हा कसं वाटतं, असे विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मला खूप अभिमान वाटतो. इतक्या दूरपर्यंत जातील, असं स्वप्नही पाहिलं नव्हतं. काही लोक शिकूनही इतकं पुढे जात नाहीत; परंतु ते मेहनतीच्या जोरावर एवढे पुढे गेले.” ‘बिग बॉस’च्या घरात रोशनला राखी सावंत, तन्वी कोलते हमालकीवरून बोलल्या होत्या. आता याबद्दल विचारल्यानंतर त्याची बायको सीमा म्हणाल्या, “मला असं वाटतं की, हमाल हा शब्द वापरायला गेला जाता कामा नये. रोशन नाव आहे त्यांचं तर बाकीच्यांना जसं नाव घेऊन बोललं जातं तसंच बोललं पाहिजे. ते हमाल आहेत. मेहनत करूनच ते इथपर्यंत आले आहेत. परंतु, ताईनं हा शब्द वापरायला नको होता. ते दहावीपासून हमालकी करत आहेत, मेहनत करत आहेत.”

सीमा यांना रोशन भाग असलेल्या टोळी ग्रुपबद्दल टोळी त्याला फार पाठिंबा देत नाहीत. ‘बिग बॉस’ने त्याला चुगली दाखवून जी संधी दिली होती, त्याचं त्यानं सोनं करायला पाहिजे होतं. असं वाटतं का याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “हो, संधीचं सोनं तर केलं पाहिजे होतं; पण ते खूप साधे आहेत. कोणीही चांगलं बोललं की, ते लगेच त्यांच्या बोलण्यात येतात; पण जर चांगलं वागूनही लोक चुगली करत असतील, तर आपण कसं राहायचं हे त्यांना समजलं पाहिजे होतं.”

टोळीबद्दल काय म्हणाल्या सीमा?

टोळी ग्रुपचा लीडर विशाल कोटियनच्या सांगण्यानुसार रोशन वागत आहे का, असं विचारल्यानंतर सीमा म्हणाल्या, “हो, असं वाटत आहेत. ते त्यांच्या सांगण्यावरूनच वागत आहेत. पण, त्यांनी विशालच्या बोलण्यात नाही आलं पाहिजे. स्वत:चा गेम खेळला पाहिजे.” रोशनचा बिग बॉसच्या घरातील रोजचा खेळ पाहून काय वाटतं, असं विचारल्यानंतर सीमा म्हणाल्या, “मला असं वाटतं की, त्यांनी स्वत: मुद्दे मांडले पाहिजेत. ते चांगलं खेळत आहेत. सर्वांना त्यांचा खेळ आवडत आहेत. ते प्रत्येक ग्रुपमधून खेळताना प्रामाणिकपणे खेळतात.”

सीमा यांना पुढे रोशनमागे इतर स्पर्धक जे बोलतात, जे डावपेच असतात, त्याचा राग येतो का, असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “हो. मला राग येतो. कारण- दर आठवड्याला त्यांनाच नॉमिनेट करत आहेत. मी मान्य करते की, त्यांना मुद्दे मांडता येत नाही. कारण- त्यांची इंग्रजी इतरांइतकी चांगली नाहीये; पण दर आठवड्याला त्यांना नॉमिनेट नाही केलं पाहिजे.”

रोशननंसुद्धा इतर स्पर्धकांप्रमाणे आवाज चढवून बोललं पाहिजे. म्हणजे तोसुद्धा इतर स्पर्धकांप्रमाणे दिसेल असं वाटतं का, असं विचारल्यानंतर सीमा म्हणाल्या, “हो. मला असं वाटत आहे की, सर्वांबरोबर राहावं; पण तन्वी जसं बोलते, तसं बोलावं.” टोळीबद्दल सीमा पुढे म्हणाल्या, “त्यांनी टोळीत राहून स्वत:च्या डोक्यानं खेळ खेळला पाहिजे. मला त्यांना विजेता होताना बघायचं आहे. आमची ती खूप इच्छा आहे.”