Ruchita Jamdar on Raqesh Bapat: बिग बॉसच्या घरात दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. स्पर्धकांमधील मैत्री जितकी पाहायला तितकेच शत्रूत्व देखील पाहायला मिळते. अनेकदा स्पर्धेकांमधील भांडण विकोपाला जाते.
नुकताच राखी सावंत आणि राकेश बापटचे कडाक्याचे भांडण होत असलेला व्हिडीओ पाहायला मिळाला. व्हिडीओच्या शेवटी राखी आणि राकेश एकमेकांच्या जवळ उभे असून ते मोठ-मोठ्याने भांडत आहेत.यावर नेटकऱ्यांनी कंमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहेत.
“हे माझ्याबरोबरही…”
आता रुचिता जामदारने देखील हा प्रोमो पाहिल्यानंतर तिचे मत व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीचा प्रोमो शेअर करत लिहिले, “हे पहिल्यांदा घडत नाही. त्याची सवयच आहे, यात नवीन काही नाही. मागचे एपिसोड बघा म्हणजे कळेल. हे माझ्याबरोबरही कितीदा केलंय. म्हणूनच ते सोयीनुसार वागतात असं मी म्हणते.
आणखी एका स्टोरीमध्ये तिने राकेश व तिच्या भांडणाचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले, “प्रत्येकाने हा एपिसोड पाहिला आहे. हरल्यानंतर, इगो हर्ट झाल्यानंतर हे असेच अंगावर आले आहेत. इतके घाणेरडे आरोप करून मेल कार्ड वापरले आहे. आपल्या पोझिशनचा फायदा उचलतात. त्यावेळी कोणी काही बोललं नाही, सगळ्यांनी डोळे बंद केले.”

पुढे तिने असेही लिहिले, “माझ्याबरोबर हे सगळं घडलं तेव्हा ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. या लोकांच्या खोट्या आरोपांसमोर उभं राहायला, तेव्हा कोणी नव्हतं. आता रिअॅलिटी बघा.”

कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोत पाहायला मिळते की मिळते की राकेश मोठ्याने ओरडतो. फालतुगिरी आहे, असेही म्हणताना दिसतो. राखीला तन्वीला म्हणते, “यांनी मला जबरदस्ती आणलं.” त्यावर राकेश म्हणतो, “तू बाळ आहेस का, जबरदस्तीने आणायला.” तिथे राकेश-राखीसह तन्वी, दिपाली, रेवादेखील आहेत.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की राकेश राखीला मूर्ख बाई असे म्हणतो. त्यानंतर राखी त्याला बधिर म्हणते. राकेश तिचं नाटक आहे, असे म्हणून तिथून जात असतो. तितक्यात राखी म्हणते, “मुलींना हत्यार बनवतोस”, हे ऐकल्यानंतर राकेशचा संताप अनावर होतो. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा भांडण होताना दिसते. तसेच, राकेश, “तुझ्या जिभेला हाड नाही का गं”, असेही म्हणत असल्याचे ऐकायला मिळते.
