Bipasha Basu Karan Singh Grover 10th Anniversary Post : बिपाशा बासू बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बिपाशा बासू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. अशातच आता तिने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
बिपाशा बासू अनेकदा सोशल मीडियावर तिच्या लेकीबरोबरचे आणि नवऱ्याबरोबरचे फोटो पोस्ट करत असते. अशातच आता लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तिने काही जुने आणि खास फोटो शेअर करत या पोस्टला छान कॅप्शनसुद्धा दिली आहे. बिपाशा या पोस्टमधून नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
बिपासा बासून शेअर केले खास फोटो
बिपाशा व अभिनेता करण सिंह ग्रोवर यांनी ३० एप्रिल रोजी २०१६मध्ये लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तिने नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना ‘सर्वात प्रेमळ माणसाबरोबरची आनंदाची १० वर्षे .देवाला माहीत होतं मला नेमकं काय हवंय . माझं आयुष्य प्रेम आणि साधेपणाभोवती फिरतं…छोटे छोटे क्षण, आयुष्यातले लहान आनंद आणि तू रोज हे सगळं आमच्या आयुष्यात भरतोस. यासाठी धन्यवाद. मी आणि देवी खूप भाग्यवान आहोत’ अशी कॅप्शन दिली आहे. शेवटी तिने हॅपी १०वा Monkeyversary असं लिहिलं आहे.
बिपाशा बासू तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. करणपूर्वी तिने बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमला डेट केलं होतं आणि दोघे त्यांच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत असायचे असं म्हटलं जातं. अभिनेता करण सिंह ग्रोवरचंसुद्धा हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री जॅनिफर विंगेटबरोबर त्याचं लग्न झालं होतं. परंतु, दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बिपाशा आणि करणला आता एक मुलगी आहे जिचं नाव त्यांनी देवी असं ठेवलं आहे.
दरम्यान, बिपाशा बासूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने २००१मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातून डेब्यू केला ज्यासाठी तिला पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर तिने ‘राज’, ‘जिस्म’, ‘धूम २’ , ‘नो एन्ट्री’, ‘रेस’, यांसारख्या चित्रपटात काम केलं. तिने टेलिव्हिजनवरील ‘डर सबको लगता है’ या शोचं सूत्रसंचालनही केलं होतं.
