‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट डान्सरच्या परिक्षकांबरोबर हास्याची दंगल पाहायला मिळणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जज सोनाली बेंद्रे, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर आणि होस्ट जय भानुशाली दिसणार आहेत. सोनी टीव्हीने आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये सोनाली आणि अर्चना पूरण सिंग यांच्यातील मजेदार संभाषण व्हायरल होत आहे. या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आपल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आलेल्या सोनाली बेंद्रेला कपिल चहा- कॉफी विचारतो. यावर सोनाली हसते आणि म्हणते, “मला अर्चनाची खुर्ची हवी आहे. सोनालीच्या या वक्तव्यानंतर अर्चना आश्चर्यचकित होते. तुम्ही लोकं आधी तुमची खुर्ची धरा, माझ्या खुर्चीच्या मागे का पडलाय? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.
हेही वाचा- ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरच्या वडिलांचे निधन; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
त्यानंतर कपिलने गीता कपूरला लक्ष्य केले आणि शूटसाठी तिच्या फॉर्मल लूकवर प्रश्नचिन्ह उभे केले. कपिल म्हणतो की ती पॅंटसूटमध्ये कोरिओग्राफर नसून एका खाजगी बँकेच्या सीईओसारखी दिसते, ज्यावर गीता गंमतीने म्हणते, “ज्या दिवसापासून मला तुमच्या खात्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हापासून मी ही बँक फक्त हाताळण्याचा निर्णय घेतला.
जय भानुशालीला स्पेस स्क्रीन हवी आहे
प्रोमोमध्ये, जय भानुशाली कपिल शर्मा आणि सुमोना चक्रवर्तीच्या विनोदावर मोठ्याने हसताना दिसला. “काही दिवसांपूर्वी मला समजले की, तुम्ही शोमध्ये जितके हसाल, तितके जास्त फुटेज तुम्हाला मिळतील.” अस जय म्हणाला. इंडियाज बेस्ट डान्सर लवकरच सोनी टीव्हीवर इंडियन आयडॉलची जागा घेणार आहे. या वीकेंडला कपिल शर्माचा हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.