नेहमी आपल्या चाहत्यांनी हसवत राहणारी आणि चर्चित अशी बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. गर्भशयात ट्यूमर असल्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज राखीवर मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. यासंदर्भातील माहिती तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारने दिली आहे.

रितेश कुमारचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत रितेश म्हणतोय की, राखीच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. जी शस्त्रक्रिया होती ती यशस्वीरित्या पार पडली आहे. पण ट्यूमर खूप मोठा आहे. अजूनपर्यंत ती शुद्धीत आलेली नाही. तीन तास शस्त्रक्रिया सुरू होती. ट्यूमर खूपच मोठा आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. कारण काही लोक हसत होते. मला नाही वाटतं, अशा लोकांमध्ये माणुसकी राहिली आहे; जे दुसऱ्यांच्या वेदनांची खिल्ली उडवतात. त्यानंतर रितेशने फोनमधील ट्यूमरचा फोटो माध्यमांना दाखवला.

हेही वाचा – Video: पारू आणि आदित्यचं झालं लग्न! पण क्षणार्धात…; ‘पारू’ मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं वेधलं लक्ष

पुढे रितेश कुमार म्हणाला, “राखी तू विचार करू नकोस. आम्ही तुझी काळजी घेऊ. पण जे काहीजण आहेत, जे माध्यमांमध्ये विधानं करत आहेत. राखीवर आरोप करत आहेत. मी त्यांना सांगतो, लवकरच तुमची उलटी गिनती सुरू होईल. कारण मारणारा आणि बचाव करणारा ईश्वर आहे. जे दोषी आहेत, त्यांना लवकरच तुरुंगात पाठवू. हे निश्चित आहे. जे झुंडमधील लोक आहेत त्यांनी गुपचूप निघून जावं. नाहीतर तुमचं देखील तुरुंगात जाणं निश्चित होईल.”

रितेशच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “राखी लवकर बरी हो, तू एंटरटेनमेंट क्वीन आहेस”, “राखी लवकर बरी होऊन ये”, अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘स्टार प्लस’च्या हिंदी मालिकेत ट्रॅक्टरवरून दमदार एन्ट्री, पाहा जबरदस्त प्रोमो

दरम्यान, काल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ संवाद साधताना राखी म्हणाली होती, “मी लवकरच बरी होईन. मी सध्या आरोग्याच्या समस्येतून जात आहे. माझ्या गर्भाशयात १० सेमीचा ट्यूमर आहे आणि शनिवारी त्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. मी माझ्या आरोग्याबाबत जास्त काही बोलू शकत नाही. पण रितेश तुम्हाला वेळोवेळी माहित देत राहिलं. माझ्या आरोग्याच्या स्थितीबाबत तो तुम्हाला अपडेट देईल. मी ट्यूमर दाखवेन, फक्त शस्त्रक्रिया होऊ दे. मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. कारण शस्त्रक्रियेपूर्वी माझा बीपी आणि इतर चाचण्या होणार होत्या. मला आता सर्वकाही माहित नाही. मी काही डॉक्टर नाही. मी अभिनेत्री आहे.”