scorecardresearch

“पिरतीच्या फडात गं…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने प्रेमात? ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘त्या’ अभिनेत्रीने शेअर केला रोमँटिक फोटो

‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ एकत्र! ‘त्या’ रोमँटिक फोटोमुळे चर्चांना उधाण

nikhil bane sneham shidam (1)
(फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतही लगीनघाई सुरू आहे. गेल्या आठवड्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सुमीत लोंढेबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता आणखी एका जोडीची चर्चा होऊ लागली आहे. ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. त्यावरून चाहते त्यांच्या अफेयरबद्द अंदाज लावत आहेत.

स्नेहलने शेअर केलेल्या या फोटोत तिच्याबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने दिसतोय. त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला आहे आणि स्नेहल लाजताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने
“पिरतीच्या फडात गं
धरला हात असा
काळीज येंधलं आरल….
” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या फोटोला तिने ‘बेस्ट फ्रेंड वेडिंग’, ‘वेडिंग सीझन’ व ‘वी आर जस्ट फ्रेंड्स’ असे हॅशटॅग दिले आहेत.

स्नेहलच्या या फोटो व कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. श्रेया बुगडेने यावर कमेंट केली आहे. ‘मला तू काहीच सांगत नाहीस’, अशी कमेंट केली आहे. तर, हेमांगी कवीने ‘बरं बरं बरं’ अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे निखिल बने आणि स्नेहल फक्त मित्र आहेत की आणखी काही हे येत्या काळातच कळेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:20 IST
ताज्या बातम्या