scorecardresearch

Premium

“माझ्या लग्नाला सासरकडून होता विरोध”, कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “मला कायम…”

अभिनेता कुशल बद्रिकेने लग्नापूर्वीचा सांगितलेला ‘हा’ किस्सा नक्की वाचा…

chala hava yevudya fame kushal badrike talk about his marriage story
अभिनेता कुशल बद्रिकेने लग्नापूर्वीचा सांगितलेला 'हा' किस्सा नक्की वाचा…

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या कुशल बद्रिकेने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाच्या आणि विनोदी शैलीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत कुशलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे कुशलचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतीच कुशलने एका सत्यघटनेवर आधारित सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याच्या प्रत्येक पोस्ट या नेहमी चर्चेत असतात. नुकतेच कुशलने स्वतःचे काही फोटो शेअर करत सत्यघटनेवर आधारित पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे, “ही पोस्ट सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासरकडून कडकडून विरोध होता. मला कायम असं वाटत राहील की माझं दिसणं हेच त्याला कारणीभूत असेल. आता हे फोटोज हाती लागेपर्यंत मी याच ‘गैर समजुतीत’ होतो.”

prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
UK Vs UK Tea Controversy
चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?
ayushmann-khurrana-viral-video
आयुष्मान खुरानाचा ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय? जाणून घ्या
Alyy Khan Kajol kissing scene
“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

हेही वाचा – काय सांगता! ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी, कुठे पाहता येणार? घ्या जाणून

“हे फोटोज मला मिळाले त्या क्षणी मी सुनयनाकडे तडक गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो, ‘या मुलाला तुम्ही नाकारलं होतं, या अशा दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी?’ सुनयना मला शांतपणे म्हणाली, ‘तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत.’ मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा ‘गैरसमज’ संपूर्ण दूर झाला. खरंच… टेक्नोलॉजी काय डेव्हलप झाली आहे यार, कॅमेरे चांगले आलेत बाजारामधे. (सुकून), @sanjaymandre तुझा कडचा ? camera भारी आहे .” असं कुशलने लिहीलं आहे.

हेही वाचा – “कपडे न घातलेलं दाखवायचं आणि…”, मुलासाठी आलेल्या जाहिराती नाकारण्याबद्दल स्पष्टच बोलला शशांक केतकर

हेही वाचा – ‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं मराठीत पदार्पण; चित्रपटाच्या नावाने वेधलं लक्ष, साकारणार हटके भूमिका

कुशलच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “अबबबबबबबबब…… अरे किती महागडा दिसतोयस तू कुश्या. चला गावी जाईन म्हणतो मी आता.” संतोष जुवेकरच्या या प्रतिक्रियेवर कुशल म्हणाला, “एकटा नाही जाऊ शकत तू, मी, विजू दादा आणि बाबाबरोबर येणार”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chala hava yevudya fame kushal badrike talk about his marriage story pps

First published on: 02-12-2023 at 11:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×