आपल्या लाडक्या कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. कलाकारांचं लाइफस्टाइल, त्यांचं घर सारं काही कलाक्षेत्रामध्ये चर्चेचा विषय ठरत असतं. काही कलाकार आपलं घर, लाइफस्टाइल याबाबत विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे स्नेहल प्रसिद्धीच्या झोतात आली. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्नेहल विलेपार्ले येथील चाळीत राहते. या चाळीमध्येच तिचं छोटसं घर आहे. काही वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर स्नेहलच्या आई-वडिलांनी विलेपार्लेच्या चाळीमध्येच घर खरेदी केलं. आधी छोटसं झोपडं होतं. त्यानंतर घराचं बांधकाम करुन घेतलं असं स्नेहलने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आणखी वाचा - २२व्या वर्षी लग्न, पाच मुलं आणि…; लग्नानंतरही राज कपूर यांचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर होतं अफेअर, पत्नीला समजलं अन्… आता स्नेहलने एक व्हिडीओ शेअर करत आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली आहे. स्नेहलचा लहान भाऊ सुरजने २२व्या वर्षी दुचाकी गाडी खरेदी केली. याचाच आनंद तिने व्यक्त केला आहे. दुचाकी गाडीची पुजा करतानाचा व्हिडीओ शेअर करत स्नेहलने म्हटलं की, "मूलं किती पटकन मोठी होतात ना… आज सुरज (बाबू) २२ वर्षांचा झाला." आणखी वाचा - प्रेमविवाह, वाद, आर्थिक चणचण अन्…; ४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत स्मृती इराणींचं भाष्य, म्हणाल्या, “त्यांच्यामध्ये…” "त्याने स्वतः गाडी घेतली. खूप अभिमानाची गोष्ट आहे. असाच मोठा हो. प्रगती कर. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊ दे. आणि ती तू पूर्ण करशीलच, बाकी राहतील त्यासाठी आम्ही आहोतच. खूप प्रेम". भावाची प्रगती पाहून स्नेहल अगदी आनंदी झाली. स्नेहलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची आई गाडीची पूजा करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.