Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्...; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल | chala hawa yeu dya bhau kadam daughter mrunmayee meet ranveer singh video and photos goes viral on social media | Loksatta

Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

भाऊ कदमच्या लेकीचे रणवीर सिंगबरोबरचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल
भाऊ कदमच्या लेकीचे रणवीर सिंगबरोबरचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामध्ये मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारही हजेरी लावताना दिसतात. नुकतंच ‘सर्कस’ चित्रपटाच्यानिमित्ताने रणवीर सिंगने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने कार्यक्रमातील कलाकारांबरोबर धमाल-मस्तीही केली. सगळ्यांचा लाडका भाऊ कदमची लेक फक्त रणवीरला भेटायला या कार्यक्रमाच्या सेटवर आली.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये अन्नाचा नाश, अर्चना गौतमने किचनमध्येच पसरवून ठेवल्या चपात्या, प्रेक्षक म्हणतात…

भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आताही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रणवीरबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. दुसऱ्यांदा ती रणवीरला भेटली. पण बॉलिवूडच्या या सुपरस्टारला भेटणं हे तिचं स्वप्न होतं.

मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर तिच्याशी बोलताना दिसत आहे. तसेच तो तिचा हात पकडतो आणि मृण्मयीबरोबर सेल्फी घेतो. मृण्मयीला तिच्या नावाने तो हाकही मारतो. मृण्मयीने फोटो व व्हिडीओ शेअर करत असताना खास पोस्टही लिहिली आहे.

आणखी वाचा – Video : बायकोची दहशत! मराठी अभिनेत्रीने नवऱ्याकडे रागाने बघताच भांडी घासू लागला अन्…; व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू होईल अनावर

मृण्मयी म्हणाली, “माझं स्वप्न सत्यात उतरलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. रणवीर सिंगकड़ून खूप काही शिकण्यासारखं आहे. एक व्यक्ती व अभिनेता म्हणून तो उत्तम आहे. माझ्या आयुष्यामधील सर्वात उत्तम व्यक्तीला मी भेटले. माझ्या वडिलांमुळेच ही भेट शक्य झाली. हे मी विसरु शकत नाही.” तसेच रणवीरला भेटण्यासाठी मृण्मयी फारच उत्सुक होती. मृण्मयीने रणवीरबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करताच यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:24 IST
Next Story
‘आई कुठे…’मध्ये मोठा ट्वीस्ट, अनघा गरोदर असताना अभिषेकने केलं दुसऱ्या मुलीला किस अन् अरुंधती…