Premium

“विनोदी अभिनेता हा शिक्का…” भाऊ कदम यांचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनोळखी प्रेक्षकांनाही…”

सध्या ते ‘करुन गेलो गाव’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत.

bhau kadam
भाऊ कदम

मराठी कलाविश्वातील अनेक नावाजलेल्या विनोदवीरांपैकी एक विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. भाऊ कदम यांनी नुकतंच विनोद आणि त्याचे सादरीकरण याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी विनोदी अभिनेता असा शिक्का बसण्याबद्दलही त्यांचे मत मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाऊ कदम यांनी नुकतंच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विनोद, त्याचं सादरीकरण, स्त्री-पात्र, टीका या सगळ्याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबरोबरच ‘विनोदी अभिनेता’ असा शिक्का बसण्याबद्दल काय सांगाल? असेही त्यांना यावेळी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले.
आणखी वाचा : ललित प्रभाकरचा हॉट लूक, बॅचलर ट्रिपऐवजी तीर्थयात्रा अन्…; ‘शांतीत क्रांती २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

यावेळी भाऊ कदम म्हणाले, “विनोद करणं सोपं नाही. त्यासाठी सराव आवश्यक असतो. अनोळखी प्रेक्षकांना हसवणं अधिक आव्हानात्मक असतं. तसेच कलाकारासह प्रेक्षकांनाही उत्तम विनोदाची जाण असायला हवी. तो बीभत्स होऊ नये, याकडं लक्ष द्यायला हवं”

आणखी वाचा : लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे भावूक; म्हणाली, “पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना…”

“विनोदी अभिनेता हा शिक्का मला आवडतो. कारण त्यानेच मला ओळख दिली. दादा कोंडकेंपासून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसह सगळेच कलाकार मला आवडतात, याचं कारण ते प्रेक्षकांना हसवण्यासाठी जीवापाड मेहनत करतात”, असेही भाऊ कदम यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान भाऊ कदम यांनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत अनेकांची मनं जिंकली. उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता म्हणून तिला ओळखते जाते. सध्या ते ‘करुन गेलो गाव’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत. यात त्यांच्याबरोबर ओंकार भोजने झळकत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chala hawa yeu dya fame actor bhau kadam talk about people says comday actor to him nrp

First published on: 25-09-2023 at 13:51 IST
Next Story
Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क