chala hawa yeu dya vicky kaushal talk about his favourite food and speak in marathi | Loksatta

मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी

विकी कौशल सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच त्याने मराठीतील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती

मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी
कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्रामवरून विकी कौशलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विकी कौशल सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच त्याने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मराठीतील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. यावेळचा त्याचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्रामवरून विकी कौशलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल मराठीत तुफान डायलॉगबाजी करताना दिसत आहे. सुरुवातीला तो सुबोध भावेच्या ‘डॉ. काशिराम घाणेकर’ चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत असून त्यावर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा- अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

याच व्हिडीओमध्ये विकी कौशलला, ‘तुझा आवडता खाद्यपदार्थ कोणता?’ असा प्रश्न डॉ. निलेश साबळे विचारताना दिसत आहेत. त्यावर विकी कौशल म्हणतो, “मला मालवणी जेवण खूप आवडतं. त्याची चवच भारी. त्याशिवाय मला बाकरवडी आवडते आणि ठेचा. कोणताही नावडता पदार्थ असेल ना तेव्हा जेवणात ठेचा असेल ना तर मग खूपच जेवण चविष्ठ लागतं.” याशिवाय या व्हिडीओमध्ये कुशल बद्रिकेची धम्माल कॉमेडी पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- “कतरिनाला माझ्यातील…”; विकी कौशलने खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा

दरम्यान या चित्रपटात विकी कौशलच्या मित्राच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून तरी तो एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल गोविंदा वाघमारे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. भूमी पेडणेकरने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर कियारा अडवाणी त्याची प्रेयसी दाखवली आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, हृषीकेश कुलकर्णी हे मराठी कलाकार आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 20:31 IST
Next Story
“मी तुला कधीच विसरु शकणार नाही कारण तू…” ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्तीची ‘ती’ पोस्ट चर्चेत