आज आहे बालदिन. दरवर्षी १४ नोव्हेंबरला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरू यांचं मुलांवरील प्रेम पाहून त्यांचा जन्मदिनी बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज कलाकार मंडळी आपले बालपणीचे फोटो शेअर करून बालदिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

सध्या दोन चिमुकल्यांचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या दोन गोड चिमुकल्या सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोन्ही चिमुकल्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. त्यामुळे दोघींच्या मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यावरून आता लक्षात आलं असेल की, या गोड चिमुकल्या कोण आहेत?

chaturang article, loksatta chaturang article, padsad readers response, readers response to chaturang article, readers response by email
पडसाद: सद्या:स्थितीवर नेमके भाष्य
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
woman arrested from mp for stealing valuable watch from actress house
अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेला मध्यप्रदेशातून अटक
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय व शाहरुख खान रुपेरी पडद्यावर घालणार धुमाकूळ; दिग्दर्शक अ‍ॅटलीने आगामी चित्रपटाची केली घोषणा

फ्रॉकमध्ये असलेल्या गोड, निरागस चेहऱ्याच्या या चिमुकल्या दोघी सख्या बहिणी आहेत. आता तर निश्चितच ओळखलं असेल. लाल फ्रॉकमधील चिमुकली आहे अभिनेत्री तितीक्षा तावडे तर पांढऱ्या फ्रॉकमधील चिमुकली आहे अभिनेत्री खुशबू तावडे. या दोघींचा फोटो खुशबूच्या फॅनपेजने शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सई कोणाची निवड करणार सागर की सावनीची? पाहा मालिकेचा नवा प्रोमो

अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अभिनेत्री खुशबू तावडे काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’वर सुरू झालेल्या ‘सारं काही तिच्या’ या मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. तिने साकारलेली उमा या भूमिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. खुशबूची ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

हेही वाचा – “…प्रियाला हाण हाण हाणा”, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनने सायलीसाठी घेतला मजेशीर उखाणा

दरम्यान, तितीक्षा व खुशबूने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. दोघींनी मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.