Colors Marathi New Serial : ‘झी मराठी’नंतर ‘कलर्स मराठी’ वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची नुकतीच घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’ने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच ‘कलर्स मराठी’ने देखील आपल्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित केला. ‘दुर्गा’ असं ‘कलर्स’च्या नव्या मालिकेचं नाव असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच मालिकेत ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये झळकलेली अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘ठिपक्यांची रांगोळी’. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेनं दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील कानिटकर कुटुंबानं अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचली. आता यामधील सुमन म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान ( Namrata Pradhan ) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Colors Marathi Serial Antarpat will be off air
‘कलर्स मराठी’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका गाशा गुंडाळणार, दोन महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या आली होती भेटीस
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Amber Ganpule future wife Shivani Sonar reaction on getting Durga marathi serial
‘दुर्गा’ मालिका मिळाल्यावर अंबर गणपुळेच्या होणाऱ्या पत्नीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, शिवानी सोनार म्हणाली, “आता तू माझ्या…”
zee marathi new serial savlyachi janu savali
‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो
Jui Gadkari Answer to Fans who ask tharla tar mag will off air
‘ठरलं तर मग’ मालिका बंद होणार की वेळ बदलणार? जुई गडकरी चाहत्यांच्या प्रश्नांचं उत्तर देत म्हणाली…

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला, कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, ट्रेलर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

‘कलर्स मराठी’ची नवी मालिका ‘दुर्गा’मध्ये नम्रता प्रधान ( Namrata Pradhan ) पाहायला मिळणार आहे. ‘दुर्गा’ मालिकेचा तिने प्रोमो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “अखेर.” त्यानंतर इतर कलाकार मंडळी आणि तिचे चाहते तिला शुभेच्छा देताना दिसले. पण ‘दुर्गा’ मालिकेच्या प्रोमोमध्ये नम्रताची झलक झालेली नाही. त्यामुळे आता नम्रता कोणत्या भूमिकेत दिसणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा – Video: सूर्याच्या ‘कंगुवा’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या खतरनाक लूकने सगळ्यांचं वेधलं लक्ष

हेही वाचा – Bigg Boss शी बोलताना योगिता चव्हाण ढसाढसा रडली! जोरदार भांडणांमुळे बिथरली, अभिनेत्रीने केली घरी जाण्याची मागणी

दरम्यान, ‘दुर्गा’ मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘या’ मालिकेमुळे नम्रता प्रधानला मिळाली खरी ओळख

नम्रता प्रधानच्या ( Namrata Pradhan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेपूर्वी ती ‘छत्रीवाली’मध्ये झळकली होती. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती. ‘छत्रीवाली’ मालिकेमुळेच नम्रताला नवी ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटात झळकली.