Colors Marathi New Timetable : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा महाअंतिम सोहळा येत्या १९ एप्रिलला पार पडणार आहे. गेल्या शंभर दिवसापासून ‘बिग बॉस मराठी’ या शोने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र, आता शंभर दिवस पूर्ण होत असल्याने लवकरच या शोचा विजेता घोषित केला जाईल. यावर्षी ‘कलर्स मराठी’वर ‘बिग बॉस मराठी’ हा शो रात्री ८ वाजता प्राइम टाइमला प्रसारित केला गेला.
‘बिग बॉस मराठी’ला प्राइम टाइम देण्यासाठी ‘कलर्स मराठी’ने जानेवारी महिन्यात काही मालिकांच्या वेळेत बदल केला होता. याशिवाय वाहिनीवर नुकत्याच दोन नव्या मालिका सुद्धा सुरू झाल्या आहेत.
आता बिग बॉस संपल्यावर पुन्हा एकदा या सगळ्या मालिकांच्या वेळेत बदल केला जाईल. २० एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’वरील चार मालिका नव्या वेळेत प्रसारित केल्या जातील. याबाबतची अधिकृत घोषणा ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत करण्यात आली आहे.
२० एप्रिलपासून या मालिकांच्या वेळेत बदल होणार…
- मी जिंकून घेईन सारं – संध्याकाळी ७ वाजता ( ४५ मिनिटं )
- मोहिनी – संध्याकाळी ७:४५ वाजता ( ४५ मिनिटं )
- जय जय स्वामी समर्थ – रात्री ८:३० वाजता
- आई तुळजाभवानी – रात्री ९ वाजता
कलर्स मराठीवर ‘मी जिंकून घेईन सारं’ आणि ‘मोहिनी’ या दोन नव्याकोऱ्या मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत. आता ‘बिग बॉस मराठी’ संपल्यावर या दोन्ही मालिका अर्ध्या तासाऐवजी ४५ मिनिटं प्रसारित केल्या जाणार आहेत. हे बदल २० एप्रिलपासून लागू केले जातील.
‘कलर्स मराठी’ने शेअर केलेली ही पोस्ट पाहून प्रेक्षकांनी देखील कमेंट्समध्ये असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी अनेकांनी “आता ९:३० वाजता काय असणार?”, “कोणती तरी नवीन मालिका किंवा शो सुरू करा” अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. आता ९:३० वाजता वाहिनीवर नवीन मालिका ऑन एअर होईल की कलर्स मराठीकडून दुसऱ्या शोची घोषणा केली जाईल हे लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात टॉप-५ मध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद हे सदस्य पोहोचले आहेत. आता यांच्यापैकी कोण बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
