‘क्राईम पेट्रोल’ व ‘सावधान इंडिया’ फेम अभिनेत्री सपना सिंहच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१० डिसेंबर रोजी) तिच्या १४ वर्षांचा मुलगा संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या दोन मित्रांना अटक केली आहे. सपनाने उत्तर प्रदेशमधील बरेली येथे आंदोलन केलं आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली. आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तिने आंदोलन संपवलं.

सपना सिंहचा मुलगा सागर गंगवार सोमवारी (९ डिसेंबर) रात्री मित्रांबरोबर बाहेर गेला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका शेतात सापडला. त्याच्या डोक्याला बंदुकीच्या गोळीच्या जखमा होत्या. त्याचे हात तुटले होते आणि पोटावरही जखमा होत्या. सपनाच्या म्हणण्यानुसार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागर मित्रांबरोबर जाताना दिसला, मात्र तो परत आला नाही.

Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
brothers and sister involved in mira road murder
मिरा रोड गोळीबार प्रकरणाचा छडा; व्यावासायिक वादातून भावा-बहिणींनी केली हत्या
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…

हेही वाचा – ‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…

सपना सिंहने दिलेल्या माहितीनुसार, संशयित अनुजने सागरला क्रिकेट खेळण्याच्या आणि वाढदिवसाच्या पार्टीत जाण्याच्या बहाण्याने नेलं. त्यांच्याबरोबर आणखी एक मुलगा होता. त्यानंतर रात्री अनुजने तिला सांगितलं की सागर सकाळी परत येईल. मात्र सागरचा फोन बंद येत होता; त्यामुळे कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली.

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुटुंबियांना सांगितलं की सागरसारखा दिसणारा एक मृतदेह सापडला आहे. त्यानंतर कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सागरचे दोन मित्र अनुज व सनी यांना बुधवारी अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

पोलिसांची प्रतिक्रिया

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक अहवालानुसार सागरचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाल्याची शक्यता आहे. तसेच त्याला त्याच्या मित्रांनी सोडून दिलं असावं, असं वाटतंय. मात्र सपनाने हे दावे नाकारले असून तिच्या मुलाचा खून झाला आहे, असं ती म्हणत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – “मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

सर्कल ऑफिसर (फरीदपूर) आशुतोष शिवम म्हणाले, “पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पण सध्या विषबाधा किंवा ड्रग ओव्हरडोजने त्याचा मृत्यू झाल्याचं दिसतंय. पुढील तपास सुरू आहे.”

सपना सिंहची प्रतिक्रिया

प्रसारमाध्यमांशी बोलताना सपना सिंहने संशयितांवर तिच्या मुलाला विष पाजल्याचा आरोप केला. तसेच त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळले होते, असा दावा तिने केला. सपना म्हणाली, “माझा मुलगा लहान होता; त्याने ड्रग्ज घेतले नव्हते. त्याचा खून करण्यात आला. माझ्या मुलाला ज्याप्रमाणे क्रूरतेने मारण्यात आलं, त्याचप्रमाणे आरोपींचा एन्काउंटर करण्यात यावा, अशी माझी मागणी आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा इयत्ता आठवीत शिकत होता. तो बरेलीच्या आनंद विहार कॉलनीत त्याचे मामा ओम प्रकाश यांच्याबरोबर राहत होता.

Story img Loader