शालिन भनौतची पहिली पत्नी व अभिनेत्री दलजीत कौर हिने मागच्या वर्षी मार्च महिन्यात दुसरं लग्न केलं. दलजीतने केन्यामध्ये स्थायिक असलेल्या निखिल पटेलशी लग्नगाठ बांधली होती. पण हे जोडपं वर्षभरात वेगळं झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे दलजीतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे व निखिलचे लग्नाचे फोटो दिसत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दलजीत सध्या भारतात आहे. ती पतीपासून वेगळी झाल्याने भारतात परतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लग्नाचे तसेच प्री-वेडिंगचे फोटो दिसत नाहीत. पती निखिल पटेलबरोबरचा एकही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर नाही. इतकंच नाही तर तिने इन्स्टाग्रामच्या बायोमधून पटेल आडनाव देखील हटवलं आहे. त्यामुळे या जोडप्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय.

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुजराती बिझनेसमनशी गोव्यात बांधली लग्नगाठ, भर मंडपात केलं लिपलॉक, Photos चर्चेत

दलजीत व निखिलच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागल्यानंतर तिच्या टीमने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दलजितच्या वतीने टीमने या चर्चांवर भाष्य केलंय. “मी असं सांगू इच्छिते की दलजीत आणि जेडन (तिचा मुलगा) सध्या दलजीतच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात आहेत आणि त्यानंतर तिच्या आईची शस्त्रक्रियादेखील होणार आहे. त्यामुळे त्यांनी इथं असणं आवश्यक होतं. या व्यतिरिक्त, मला एवढंच सांगायचं आहे की दलजीत सध्या कोणत्याही गोष्टीवर टिप्पणी करणार नाही. कारण यात दोघांची मुलंही गुंतलेली आहेत. त्यामुळे कृपया तिच्या मुलांच्या प्रायव्हसीचा आदर करा. इतकंच तिला सांगायचं होतं.”

“बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन आईवर…”, गश्मीर महाजनीने सांगितली बालपणीची आठवण; म्हणाला, “तिला लग्नाआधीच…”

शालिन व दलजीत यांनी २००९ मध्ये लग्न केलं होतं आणि सहा वर्षांनी घटस्फोट घेत ते २०१५ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. दलजीतने शालिनवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यांना जेडन हा मुलगा आहे. त्यानंतर २०२३ मध्ये दलजीतने दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. तिने १८ मार्च २०२३ रोजी निखिल पटेलशी लग्न केलं. निखिलला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalljiet kaur nikhil patel separation rumours her team reacts after actress removed wedding photos hrc
First published on: 10-02-2024 at 08:32 IST