scorecardresearch

“ती श्वास तरी घेत आहे ना?” एक महिन्याच्या लेकीची अवस्था पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, रुग्णालयात नेलं अन्…

देबिना बॅनर्जीने मुलीच्या तब्येतीबाबत केलं भाष्य. लेकीला श्वास घेणंही झालं कठीण.

“ती श्वास तरी घेत आहे ना?” एक महिन्याच्या लेकीची अवस्था पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, रुग्णालयात नेलं अन्…
देबिना बॅनर्जीने मुलीच्या तब्येतीबाबत केलं भाष्य. लेकीला श्वास घेणंही झालं कठीण.

मालिका विश्वामधील सुप्रसिद्ध जोडी म्हणजे गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी. या सेलिब्रिटी कपलला आजवर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. एप्रिलमध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांचा गरोदर असलेल्या देबिनाला महिन्याभरापूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं आहे. पण आता तिच्या लेकीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या रायने गाल ओढल्यानंतर रणवीर सिंगने चक्क तिच्या हातालाच केलं किस, लेक दोघांकडे पाहातच राहिली अन्…

देबिनाने तिच्या व्लॉगद्वारे लेक आजारी असल्याचं सांगितलं. देबिना यावेळी ढसाढसा रडत होती. देबिना म्हणाली, “तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की माझी मुलगी नऊ महिन्यांपूर्वीच या जगात आली. ती थोडी अशक्त आहे. रविवारी (१७ डिसेंबर) अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.”

“मी आणि गुरमीत तिला लगेचच रुग्णालयामध्ये घेऊन गेलो. तिच्या ऑक्सिजनची पातळीही ९२वर आली होती. घर ते रुग्णालय हा प्रवास खरंच गुरमीत व माझ्यासाठी अगदी अशक्य होता. ती श्वास घेत आहे ना? फक्त हा एकच प्रश्न मी प्रवासादरम्यान गुरमीतला विचारत होते.”

आणखी वाचा – गरोदरपणातच नवऱ्याने आईला करिश्मा कपूरच्या कानाखाली मारण्यास सांगितली, अभिनेत्रीही मागे हटली नाही अन्…

आता देबिनाच्या मुलीच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे. पण सध्यातरी दोघंही तिची पुरेपूर काळजी घेत आहेत. शिवाय दुसऱ्या गरोदरपणानंतर सतत रडावसं वाटत असल्याचं देबिनाचं म्हणणं आहे. पण डिप्रेशनमुळे हे असावं असं देबिनाला वाटतं. लेकीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा असंही तिने चाहत्यांना सांगितलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 12:58 IST

संबंधित बातम्या