Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या चौथ्या आठवड्याची सुरुवात खूपच धमाकेदार झाली. आधी प्रभू शेळके व विशाल कोटियनचं भांडण झालं. त्यानंतर रुचिता व राकेश बापट एकमेकांना भिडले. आता राकेशवरून रुचिताने दिपाली सय्यदशी जोरदार भांडण केलं. यानंतर दिपालीचा संताप अनावर झाला.

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसत आहे. या भांडणामुळे घराचे वातावरण पूर्णपणे तापले आहे.

प्रोमोमध्ये रुचिता दिपालीवर आरोप करते. “हिने असं सर्वांना सांगितलं की रुचिता तू आरबीला (राकेश बापट) टच केलंस,” असं रुचिताने म्हटल्यावर दिपाली भडकते. “रुचिता मी तुझ्यावर बोललेली नाही. मी नव्हती ती. मी नव्हती,” असं दिपाली म्हणते.

रुचिता दिपालीला “अंगावर चढू नकोस” असं बोलते. यावर दिपाली बोट खाली कर, बोट खाली कर, असं रुचिताला म्हणते. मग संतापलेली दिपाली हात उगारते आणि ‘एक झानकन देईन ना’ असं म्हणते, त्यावर रुचिता ‘चल मार’ असं बोलते. त्यानंतर शेवटी कानाखाली वाजवल्याचा आवाज येतो. त्यामुळे दिपालीने खरंच रुचिताला कानाखाली मारली की नाही हे रात्रीच्या एपिसोडमध्ये कळेल.

पाहा व्हिडीओ-

बिग बॉस मराठीचा हा प्रोमो पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. रुचिताला घराबाहेर काढा, रुचिताने अती केलंय, असं वाटतं सगळे जण बिग बॉसच्या घरात खेळायला आहेत, पण ही रुचिता कोणत्या गावावरून आली काय माहिती फक्त भांडत राहते, बिग बॉस हिला पटकन बाहेर काढा घरामध्ये शांती पाहिजे अशांतता नाही, Bigg Boss season 5 खूप मस्त वाटत होता पण हा सीजन खूपच भांडणांमध्ये चाललेला आहे, तो सीजन गाजला होता आता हा काय होतो काय माहिती, TRP साठी BB रुचिताला घरात ठेवतीय पण त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वैभवाला नक्कीच हानी पोहोचणार आहे. भाषेचा स्तर खालवणार असून यातून आदर्श निर्माण होणार नाही, अशा कमेंट्स या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.