Deepali Sayyed Weight Loss : दिपाली सय्यद मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अलीकडेच तिने ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामध्ये सहभाग घेतला होता. यामुळे संपूर्ण सीझन ती चर्चेत होती. दिपाली अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर तिने तिचा अनुभव सांगितला आहे.
दिपाली संपूर्ण सीझन कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत होती. ‘बिग बॉस’च्या घरात अनेक सोयी सुविधांशी तडजोड करावी लगते. खाण्या-पिण्यची तारांबळ होते. असं अनेक जणांनी म्हटलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामधील स्पर्धक सोनाली राऊत हिनेसुद्धा अशीच तक्रार केली होती. अशातच आता दिपालीनेसुद्धा याबद्दल सांगितलं आहे.
दिपालीने ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक खाऊन पिऊन नीट राहत होते. तिने खिरसुद्धा बनवलेली पण, घरात सतत डोक्यावर असलेला ताण, गेमसाठी स्ट्रेटजी प्लॅन करणं यामुळे खूप मानसिक थकवा येतो आणि याचा परिणाम प्रकृतीवर होतो असं म्हटलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…
दिपाली सय्यद तिच्या कमी झालेल्या वजनाबद्दल म्हणाली, “बारीक होण्याचं कारण जेवण वगैरै नाहीये. मी तिकडे खीर पण बनवलीये. आम्ही जे काही असेल ते खायचो. पण, इतकं डोकं वापरावं लागायचं की त्यात सगळी उर्जा जायची. त्यामुळे आम्ही बारीक झालो आहोत. इतका त्याचा तान असायचा.” ‘बिग बॉस’बद्दल दिपाली पुढे म्हणाली, “बिग बॉस माझ्या आयुष्यातील एक असा प्रवास आहे जो मी कधीच विसारणार नाही. आता तर माझी प्रवास नव्याने सुरू झाला आहे.”
दिपालीने सांगितलं वजन कमी होण्यामागचं कारण
वजन घटल्याबद्दल दिपाली म्हणाली, “माझं वजन आधी ८० किलो होतं. मागच्या दोन वर्षांमध्ये मी हळूहळू वजन कमी करत गेले. मला वाटलं की आता मी वजन तर कमी केलं आहे पण, लोकांना दिसणार कशी? संधी तर पाहिजे ना? मग बिग बॉसची मला ऑफर आली. पहिल्या सीझनपासून मला बिग बॉसची ऑफर होती. पाचही सीझनला मी नाही म्हटलं. पण, सहाव्या सीझनवेळी मी स्वत:ला आव्हान देण्याचं ठरवलं. म्हटलं करुन बघुया. ही माझी परिक्षा आहे. माझ्या डोक्यात एवढंच होतं की १०० दिवस मला राहायचं आहे आणि आता मला त्याचा आनंद आहे.”
