Deepti Lele on Gauri Ingawale: अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या अनेक कलाकारांमध्ये उत्तम मैत्री असल्याचे पाहायला मिळते. अनेक कलाकार विविध मुलाखतींमधून त्यांच्या कला क्षेत्रातील मैत्रीबद्दल वेळोवेळी बोलत असतात. सध्या सोशल मीडियामुळेही या कलाकारांच्या विविध गोष्टी चाहत्यांना जाणून घेता येतात.

कलाकार विविध फोटो, पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तसेच अनेकदा त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाची माहितीही शेअर करतात. त्याबरोबरच ते काम करीत असलेल्या सेटवरील सहकलाकारांबरोबरचे अनेक व्हिडीओही ते शेअर करत असतात. त्यामुळे पडद्यामागे कलाकारांमध्ये कसे नाते आहे, त्यांच्यातील बॉण्डिंग कशी आहे हे चाहत्यांना पाहायला मिळते.

अभिनेत्री दीप्ती लेले आणि गौरी इंगवले या पाठराखीण या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत एकत्र काम करीत आहेत. या मालिकेतील दोघींच्या भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता दीप्ती लेलेने गौरीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटले, तेव्हा ती…”

गौरीचा नुकताच वाढदिवस झाला. या निमित्ताने दीप्तीने ही पोस्ट शेअर केली. विविध ठिकाणचे, विविध प्रसंगांचे काही व्हिडीओ, फोटो शेअर करीत अभिनेत्रीने गौरीबरोबरच्या बॉण्डिंगबद्दल लिहिले. दीप्तीने लिहिले, “जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटले, तेव्हा ती एक लाजरी छोटी मुलगी होती. मी तिला जवळ घ्यायचे आणि माझ्या मिठीत ती अगदी शांतपणे झोपी जायची आणि आज मी तिच्याकडून सल्ले घेत असते.”

पुढे तिने लिहिले, “तिला मोठं होताना पाहणं, तिच्याबरोबर स्वतःही मोठं होत जाणं आणि प्रत्येक वर्षागणिक आमच्यातलं बॉण्डिंग अधिक घट्ट होताना अनुभवणं, गेल्या १० वर्षांचा हा प्रवास अविस्मरणीय आहे. एकेकाळी मी तिला कुशीत घेत होते, आता मी तिचं मनापासून ऐकत असते. हा प्रवास सुंदर आहे.”

दीप्तीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. प्राजक्ता गायकवाडने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तर गौरी दीप्तीची पोस्ट वाचून भावूक झाल्याचे तिच्या कमेंटमधून लक्षात येत आहे. गौरीने लिहिले, “आय लव्ह यू सो मच. तुझ्याबरोबरचा हा प्रवास अविश्वसनीय आहे. तुझ्याबरोबर मला आणखी आठवणी तयार करायच्या आहेत. थँक्यू दीप्तीताई”, असे लिहीत गौरीने दीप्तीचे आभार मानले.

दरम्यान, पांघरूण या सिनेमात दीप्ती व गौरी एकत्र दिसल्या होत्या. सध्या त्या पाठराखीण या मालिकेत एकत्र काम करीत आहेत. त्या अनेकदा डान्सचे व्हिडीओही शेअर करीत असतात.